BCCI Vs Kolkata Ticket Black Marketing : कोलकातामध्ये आज इडन गार्डनवर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ भिडत आहेत. मात्र या सामन्यावेळी तिकीट विक्रीत काळाबाजार झाल्याचा आरोप क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. याची दखल कोलकाता पोलिसांनी घेतली असून कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना नोटीस पाठवली आहे.
कोलकाता पोलिसांनी बीसीसीआय अध्यक्ष बिन्नी यांना शनिवारी सायंकाळीच ही नोटीस जारी केली आहे. यात मैदान पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआय अध्यक्षांना तिकीट विक्रीबाबतचे दस्तऐवत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'बीसीसीआयच्या अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तिकीट विक्रीच्या काळाबाजार प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही त्यांना तिकीट विक्रीबाबतचे सर्व दस्तऐवज स्वतः किंवा त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत मंगळवारपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.'
भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान तिकाटीचा काळा बाजार झाल्याच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी आतापर्यंत 19 लोकांना अटक केली आहे. या आरोपींकडून 108 तिकीटे देखील जप्त करण्यात आली आहेत. याचबरोबर तिकीटांचा काळा बाजार केल्याप्रकरणी सात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.