korea Baek criticized the Olympic organization over archery coaches denied Sakal
क्रीडा

Olympic Games Paris 2024 : तिरंदाजी प्रशिक्षकांना ऐनवेळी डच्चू; कोरियाच्या बेक यांची ऑलिंपिक संघटनेवर टीका

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारतीय तिरंदाजी संघात मोठी घडामोड घडली आहे. कोरियन प्रशिक्षक बेक वूंग की यांना अधिस्वीकृती नाकारण्यात आल्यामुळे त्यांना भारतात परतावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारतीय तिरंदाजी संघात मोठी घडामोड घडली आहे. कोरियन प्रशिक्षक बेक वूंग की यांना अधिस्वीकृती नाकारण्यात आल्यामुळे त्यांना भारतात परतावे लागणार आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेनेच आपली अधिस्वीकृती नाकारल्याची टीका बेक यांनी केली आहे.

भारतीय तिरंदाजी संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याबरोबर बेक वूंग की यांचा असलेला करार ३० ऑगस्ट रोजी संपणार होता. तो पुढे वाढवण्यास त्यांनी नकारही दिला होता. मी कोरियन प्रशिक्षक आहे.

ऑलिंपिकसाठी भारतीय तिरंदाजी संघ तयार करण्यासाठी मी ऑगस्टपर्यंत करार केला होता; परंतु महत्त्वाच्या क्षणी मला प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आले आणि मला सोनिपथ येथे परतण्यासाठी शनिवारचे विमानाचे तिकीट देण्यात आले. आता भारतातील प्रक्रिया पूर्ण करून मी कोरियात परतणार आहे, असे बेक यांनी सांगितले.

बेक वूंग की हे नावाजलेले प्रशिक्षक आहेत. २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कोरियाने दोन सुवर्णपदके मिळवली होती. भारतीय संघाबाबतच्या या अनुभवाबद्दल त्यांनी ऑलिंपिक संघटनेला जबाबदार धरले.

सुमार आणि अविचारी संघटना अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तिरंदाजीच्या स्पर्धा आता काही दिवसांवर आल्या आहेत आणि त्याचवेळी आपल्याला संघापासून दूर करण्यात आले हे अतिशय चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत पदके मिळवण्यासाठी मी भारतीय संघाला दोन वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे; पण अविचारी निर्णय घेणाऱ्या भारतीय ऑलिंपिक संघटनेला माझे मोल नाही. अशा निर्णायक क्षणी मला दूर करायचे होते तर माझ्यावर एवढा खर्च कशाला केला. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर मी संघाच्या जवळही राहू शकत नाही, हे फार खेदाचे आहे, अशी स्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केली.

माझी संघासोबतची उपस्थिती खेळाडूंचे मनोबल उंचावणारी ठरली असती. दडपणाच्या स्थितीत मनोबल कसे उंचावायचे हे खेळाडूंना शिकता आले असते, असेही ते म्हणाले. पदकासाठी जर भारत आणि कोरिया यांच्यात सामना झाला तर आता भारतीय संघ पराभूत होण्याची ९० टक्के शक्यता आहे आणि मी जर भारतीय संघासोबत असतो तर कोरिया संघावर माझ्या उपस्थितीचे दडपण आले असते आणि भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या असत्या, असेही त्यांनी नमूद केले.

या पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रत्येकी तीन पुरुष आणि महिला तिरंदाज पात्र ठरले आहेत. १२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय तिरंदाज ऑलिंपिकमध्ये खेळणार आहेत. आता मी संघासोबत नसलो तरी भारतीय खेळाडू पदक मिळवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने राष्ट्रीय प्रशिक्षकांसह अनेक वैयक्तिक प्रशिक्षकांना पॅरिसमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे; परंतु तिरंदाजीच्या स्पर्धा काही दिवसांवर आल्या असताना बेन वून की यांना अचानक दूर करण्याचा निर्णय संभ्रम निर्माण करणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT