Asia Cup 2023 India Reached In Final  esakal
क्रीडा

Asia Cup 2023 Final : भारताने कडवी झुंज मोडून काढत गाठली फायनल; लंकेला वेल्लालागेच्या रूपाने मिळाला जडेजा

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 India Reached In Final : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मधील श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतावर 20 वर्षाचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालागे चांगलाच भारी पडला. त्याने गोलंदाजीत 40 धावात भारताचा निम्मा संघ गारद केलाच याचबरोबर फलंदाजीत देखील नाबाद 42 धावांची खेळी करत भारताचा चांगलेच टेन्शन दिले.

मात्र कुलदीप यादवने 4 विकेट्स घेत लंकेची ही झुंज मोडून काढत भारताला 41 धावांनी विजय मिळवून दिला. याचबरोबर भारत यंदाच्या आशिया कपची फायनल गाठणारा पहिला संघ देखील ठरला.

सामन्यात 41 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. भारताने ठेवलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 172 धाावात गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने देखील 2 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेकडून 20 वर्षाच्या युवा वेल्लालागेने झुंजार खेळी करत नाबाद 42 धावांची खेळी केली. तर धनंजया डि सेल्वाने 41 धावा करून भारताचे टेन्शन वाढवले होते.

भारताचे 214 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने त्यांची अवस्था 3 बाद 25 धावा अशी केली. मात्र त्यानंतर समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी भागदीरी रचण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कुलदीप यादवने मोडून काढला.

यानंतर रविंद्र जडेजाने देखील आपला जलवा दाखवत श्रीलंकेची अवस्था 6 बाद 99 धावा अशी केली होती. मात्र धनंजया डि सेल्वा आणि युवा दुनिथ वेल्लालागे यांनी सातव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचत भारतापासून सामना दूर नेला होता.

मात्र ही जोडी रविंद्र जडेजाने पोडली अन् भारताने सामन्यावर पकड निर्माण केली. धनंजयाने 41 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या डावखुऱ्या वेल्लालागेने देखील चिवट फलंदाजी करत नाबाद 42 धावा केल्या.

मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. कुलदीप यादवने लंकेच्या शेपटाला वळवळण्याची संधी न देता त्यांचा डाव 172 धावात संपुष्टात आणला. वेल्लालागेची झुंज वाया गेली. त्याने गोलंदाजीतही कमाल करत भारताचा निम्मा संघ गारद केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT