Kylian Mbappe Became Richest Footballer esakal
क्रीडा

Kylian Mbappe : मेस्सी-रोनाल्डोला मागे टाकत 22 वर्षांचा पठ्ठया बनला सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू

जयेश सावंत

Kylian Mbappe Became Richest Footballer : जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल, आता फुटबॉल म्हटलं तर मेस्सी आणि रोनाल्डोची चर्चा तर होणारचं ! फुटबॉल जगतातील या दोन दिगज्जांनी गेले कित्येक वर्षे असंख्य फुटबॉल चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले, सोबत बक्कळ कमाईसुद्धा केली. मात्र आता कमाईच्या बाबतीत ह्या दोघांना एका २२ वर्षाच्या खेळाडूने मागे टाकलंय, तो खेळाडू म्हणजे मेस्सीच्याच पॅरिस सेंट जर्मन संघातील फ्रेंच साथीदार किलियन एमबाप्पे! (Kylian Mbappe)

फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत पीएसजीच्या (Paris saint German) या स्टार फॉरवर्डने सहकारी लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि मँचेस्टर युनायटेडचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांना मागे टाकले आहे. इतर कोणत्याही फुटबॉलपटूने या प्रतिष्ठित जोडीला कमाईच्या बाबतीत मागे टाकत मोठी झेप घेण्याची नऊ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

रोनाल्डो किंवा मेस्सी व्यतिरिक्त या यादीत अव्वल स्थान मिळवणारा शेवटचा खेळाडू 2013 मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम (David Beckham) होता. एमबाप्पे या मोसमात USD 128 दशलक्ष कमावणार आहे. दरम्यान, दुसऱ्या स्थानावर असलेला मेस्सी USD 120 दशलक्ष आणि तिसऱ्या स्थानावर असलेला रोनाल्डो USD 100 दशलक्ष कमवेल असा अंदाज आहे.

एमबाप्पे (kylian mbappe) अलीकडे EA Sports 'FIFA 23' या व्हिडिओ गेमच्या मुखपृष्ठावर दिसला. यासोबतच एमबाप्पेने Nike, Dior, Hublot, Oakley आणि Panini सारख्या ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कमावलेल्या रकमेचा अंदाज जवळपास USD 18 दशलक्षच्या घरात आहे.

सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूच्या या यादीत मेस्सी एमबाप्पेचा PSG मधील साथीदार फॉरवर्ड नेमार (neymar) ८७ दशलक्ष डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह (mohammad salah) ५३ दशलक्ष डॉलर्ससह पाचव्या, मँचेस्टर सिटीचा नवा एर्लिंग हॅलँड (Erling Haland) ३९ दशलक्ष डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आहे. बार्सिलोनाचा फॉरवर्ड रॉबर्ट लेवांडोस्की (robert Lewandowski) ३५ दशलक्ष डॉलर्ससह आठव्या स्थानावर असून, रियल माद्रिदचा इडन हॅझार्ड (eden Hazard) USD 31 दशलक्ष नवव्या तर व्हिसेल कोबेचा आंद्रेस इनिएस्टा (Ineista) USD 30 दशलक्ष आणि मँचेस्टर सिटीचा केविन डी ब्रुयन (Kevin de brunye) USD 29 दशलक्ष अनुक्रमे दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT