Lakshya Sen wins Canada Open 2023  
क्रीडा

Lakshya Sen : जिंकला रे...! रोमांचक सामन्यात लक्ष्य सेनने पटकावले कॅनडा ओपनचे विजेतेपद

Kiran Mahanavar

Canada Open Badminton 2023 Lakshya Sen : कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगचा सरळ गेममध्ये पराभव करून कॅनडा ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. सेनने 10 व्या मानांकित चिनी खेळाडूचा 21-18, 21-20 असा पराभव केला. लक्ष्याची ही दुसरी कॅनडा ओपन फायनल होती. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली होती.

मोसमाच्या सुरुवातीला सेन फॉर्ममध्ये नव्हता, ज्यामुळे तो क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर घसरला होता. 21 वर्षीय खेळाडूने 2021 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. या सामन्यापूर्वी त्याने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या केंटा निशिमोटोवर सरळ गेममध्ये विजय मिळवला होता. सेनने 11व्या मानांकित जपानच्या खेळाडूचा 21-17, 21-14 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लक्ष्य सेन यांच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो बराच काळ ब्रेकवर होता. लक्ष्यला त्याच्या पुनरागमनानंतर लयीत यायला बराच वेळ लागला. मात्र थायलंड ओपनची उपांत्य फेरी गाठून त्याने पुनरागमनाची चिन्हे दाखवली. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी लक्ष्य पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहे.

पीव्ही सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव

दरम्यान, महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधूला 14-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT