- चिन्मय जगताप
TENNIS PREMIER LEAGUE SEASON 6 AUCTIONS : मुंबईत बुधवारी भारतीय टेनिसविश्वातील तीन दिग्गज लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा पहिल्यांदाच एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. टेनिस प्रीमियर लीग 6 च्या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी हे तिघही एकत्र आले. यावेळी लिएंंडर पेसने महेश आणि सानिया यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना तो म्हणाला की, २०१२ नंतर पहिल्यांदा आम्ही तिघंही एकाच ठिकाणी भेटलो आहोत. महेश भूपतीने माझ्यासोबत अनेक स्पर्धा गाजवल्या. त्याच्या मेहनतीमुळेच मला आज इतकं नाव लौकिक मिळालं आहे. आजवर आमच्यात कधीच वाद झाले नाहीत असं नाही.
तो पुढे म्हणाला,''आमच्यामध्ये टेनिस कोर्टबाहेरील गोष्टींवरून कधीच वाद झाले नाही. जे काही खूप वाद झाले ते टेनिसला समोर ठेवूनच झाले. आजवर आम्ही दोघांनी एकत्र मिळून एकूण ४० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. तर सानिया मिर्झा हिच्यासोबत मला ऑलम्पिक मेडल जिंकता आलं याचा मला प्रचंड अभिमान आहे.''
या लिलावामध्ये २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यानने प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतला. तिच्यावर ४२.२० लाख अशी सर्वोच्च बोली लागली.पंजाबने तिला आपल्या ताफ्यात घेतलं. बंगळुरूने ऑस्ट्रेलियाचा मॅक्स पर्सेल याच्यासाठी ४२ लाख रुपये मोजले.ऑलिम्पिकपटू अंकिता रैनाला ५ लाख रुपयांत बंगळुरूने संघात दाखल करून घेतले. गुजरातने पँथर्स सुमित नागलसाठी ३५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. सहजा यमलापल्लीला ७.८० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.
टेनिस प्रीमिअर लीगचा सहावा हंगाम ३ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात पार पडेल. बंगळुरू एसजी पायपर्स, बंगाल विझार्ड्स, पंजाब पेट्रियॉट्स, हैदराबाद स्ट्रायकर्स, गुजरात पँथर्स, यश मुंबई ईगल्स, चेन्नई स्मॅशर्स आणि श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स हे आठ संघ मैदानात असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.