Legend Cricket sakal
क्रीडा

Legend Cricket : लिजेंड्स लीग क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानचे क्रिकेटपटू नाहीत

लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

Kiran Mahanavar

Legend Cricket : लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लेजेंड्स लीग क्रिकेटचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. भारतात होणारी लीजेंड्स लीग क्रिकेट सामने कोलकाता, नवी दिल्ली, कटक, लखनौ आणि जोधपूर या शहरांमध्ये खेळवले जातील. या क्रिकेट लीगमध्ये पाकिस्तानचे क्रिकेटपटू खेळणार नाहीत.

लीगचे प्लेऑफ आणि अंतिम सामने कुठे खेळवले जातील, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 5 आणि 7 ऑक्टोबरला प्लेऑफचे सामने होणार आहेत. तर अंतिम सामना ८ ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 16 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. लीगचे पहिले तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवले जातील. या लीगमध्ये अनेक क्रिकेट दिग्गज पुन्हा एकदा मैदानावर आपली ज्योत पसरवताना दिसणार आहेत.

Legend लीग क्रिकेट सीझन 2 चे अधिकृत प्रसारण अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सोनी नेटवर्क चॅनेलवर तुम्ही इंडिया लीजेंड्स विरुद्ध द रेस्ट ऑफ द वर्ल्ड यांच्या सुरुवातीच्या सामन्याचे प्रक्षेपण देखील पाहू शकाल. त्याच वेळी सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाइव्ह अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तथापि, सामना थेट पाहण्यासाठी वापरकर्त्यांना सदस्यता आवश्यक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

SCROLL FOR NEXT