Legends League Cricket Imran Tahir explosive batting video esakal
क्रीडा

VIDEO: गोलंदाज इम्रान ताहिरची फलंदाजांना लाजवणारी फटकेबाजी

अनिरुद्ध संकपाळ

मस्कत : लेजंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात इंडिया महाराजाला (India Maharajas) वर्ल्ड जायंट्स (World Giants) विरूद्ध २१० धावा करून देखील पराभवचा सामना करावा लागला. इंडिया महाराजाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिर (Imran Tahir). त्याने गोलंदाजीत काही कमाल दाखवली नाही तर आश्चर्यकारकरित्या फलंदाजीत तुफान फटकेबाजी करत इंडिया महाराजाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. (Legends League Cricket Imran Tahir explosive batting video)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंडिया महाराजाने सलामीवीर नमन ओझाच्या (Naman Ojha) ६९ चेंडूत केलेल्या १४० धावांची धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर २१० धावा उभारल्या. इंडिया महाराजाचा कर्णधार मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) ५३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. इंडिया महाराजाने वर्ल्ड जायंट्स समोर ठेवलेल्या २१० धावांचे मोठे आव्हान पाहता इंडिया महाराजा हा सामना आरामात जिंकतील असे वाटत होते.

मात्र वर्ल्ड जायंट्सचा ४२ वर्षाचा तरूण इम्रान ताहिरने (Imran Tahir) फक्त १९ चेंडूत ५२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत सामन्याचे चित्रच पालटले. वर्ल्ड जायंट्सने सामना तीन चेंडू राखून जिंकला. ताहिर बरोबरच वर्ल्ड जायंट्सकडून केविन पिटरसनने २७ चेंडूत ५३ धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT