Lesbian Couples And Players In Paris Olympics 2024 Esakal
क्रीडा

कुणी एकटे तर कुणी पार्टनरसोबत गाजवणार 'सिटी ऑफ लव्ह'; Paris Olympics मध्ये भाग घेणारे टॉप लेस्बियन खेळाडू

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. ही स्पर्धा जशी जशी जवळ येत आहे तसा तसा क्रीडा चाहत्यांचा उत्साहही वाढत आहे. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी मैलाचे दगड ठरत आहे.

पॅरिसमध्ये होणाऱ्या यंदाच्या ऑलिम्पिक गेम्समध्ये अनेक LGBTQIA खेळाडू सहभागी होणार आहेत आणि विशेष म्हणजे यातील सर्वाधिक खेळाडू स्पर्धेत ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्तव करणार आहेत. त्यामुळे यावेळचे ऑलिम्पिक गेम्स लिंगभेदाला छेद देणार ठरणार आहे यात शंका नाही.

याच पार्श्वभूमिवर आपण 'सिटी ऑफ लव्ह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक्स 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या महत्त्वाच्या 3 LGBTQIA खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.

मेग जोन्स

मेगन जोन्स, पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये ग्रेट ब्रिटनच्या महिल रग्बी संघाची सदस्य असणार आहे. ती एक लेस्बियन आहे. मेग तिच्या लैंगिकतेबद्दल कायमच खुलेपणाने बोलत असते आणि तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, तिचा द्वेष करणाऱ्यांचा तिला कोणताही त्रास होत नाही.

"जे लोक 'लेस्बियन' या शब्दाचा नकारात्मक अर्थ लावतात तेच लोक माझ्या 'लेस्बियन' असण्याबद्दल बोलतात. हे खूपच मजेदार आहे कारण मी एक लेस्बियन आहे, आणि अर्थातच ही वाईट गोष्ट नाही, म्हणूनच मला याचा कोणताही त्रास होत नाही," असे मेगने मेट्रोशी बोलताना सांगितले होते.

मेग सध्या तिची सहकारी रग्बी खेळाडू सेलिया क्वानसह रिलेशनशिप मध्ये आहे. त्यांच्या या नात्याची सुरुवातीला लॉफबरो विद्यापीठात झालेल्या भेटीनंतर झाली होती.

2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये या दोघींनी एकत्रितपणे ग्रेट ब्रिटनच्या महिला रग्बी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

मेग 2016 मध्ये रिओ डी जनेरियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक गेम्समध्ये ग्रटे ब्रिटनच्या संघात राखीव खेळाडू म्हणून सहभागी झाली होती.

किर्स्टी गिल्मर

किर्स्टी गिल्मरचा जन्म 21 सप्टेंबर 1993 रोजी झाला असून, ती स्कॉटिश बॅडमिंटन खेळाडू आहे. जीने स्कॉटलंड आणि ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व करते. यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आतापर्यंत ऑलिम्पिकचे एकही पदक जिंकू न शकलेली किर्स्टी कॉमनवेल्थ गेम्समध्ये मात्र रौप्य आणि कांस्य पदक जिंकली आहे.

किर्स्टी सध्या ग्लासगो येथे स्थायिक आहे. तिने स्कॉटलंडच्या वेस्ट ऑफ स्कॉटलंडच्या विद्यापीठातून शिक्षण घेतले.

गिल्मर उघडपणे लेस्बियन असल्याचे सांगते. कोणत्याही स्पर्धेच्या अव्वल 100 मध्ये स्थान मिळविणारी ती सध्या एकमेव एलजीबीटी बॅडमिंटनपटू आणि अगदी मोजक्या एलजीबीटी व्यावसायिक बॅडमिंटनपटूंपैकी एक आहे.

जास्मिन जॉइस

जास्मिन जॉयस-बुचर्स ही वेल्शची रग्बी खेळाडू आहे जी 2024 पॅरिसमधील ग्रेट ब्रिटनच्या महिला रग्बी संघाचा भाग असेल.

यापूर्वी 2016 आणि 2020 मध्ये ऑलिम्पिक गेम्समध्ये जस्मिनने ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले आहे. याचबरोबक तीन वेगवेगळ्या ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी ती पहिली ब्रिटिश रग्बी खेळाडू बनण्याचा विक्रम करेल.

जस्मिनने ती समलिंगी असल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. यासह तिने 2023 मध्ये तिची संघ सहकारी अलिशा बुचर्सशी लग्न केले आहे. LGBTQIA च्या मुद्द्यांसह ती कायमच महिला सशक्तीकरणाबद्दल बोलत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT