Liang Jingkun sakal
क्रीडा

Liang Jingkun : वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत लिआंगला विजेतेपद

वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत चीनचा १७ वर्षीय लीन शिदाँग जायंट किलर ठरला. पण पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत नव्या दमाच्या खेळाडूला देशवासीय लिआंग जिंगकुन याचा अनुभव भारी ठरला.

सकाळ वृत्तसेवा

वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत चीनचा १७ वर्षीय लीन शिदाँग जायंट किलर ठरला. पण पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत नव्या दमाच्या खेळाडूला देशवासीय लिआंग जिंगकुन याचा अनुभव भारी ठरला.

पणजी - वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत चीनचा १७ वर्षीय लीन शिदाँग जायंट किलर ठरला. पण पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत नव्या दमाच्या खेळाडूला देशवासीय लिआंग जिंगकुन याचा अनुभव भारी ठरला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या लिआंगने चिवट झुंजीनंतर ४-२ फरकाने विजय मिळवून कारकिर्दीतील चौथे डब्ल्यूटीटी विजेतेपद मिळविले. एकेरीत चिनी खेळाडूंनी दबदबा राखला.

ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम लढतीत २६ वर्षीय जिंगकुन सुरुवातीस १-२ गेम्सने पिछाडीवर होता. नंतर अनुभव पणास लावत त्याने यावर्षीचे पहिले डब्ल्यूटीटी एकेरी विजेतेपद प्राप्त केले. जिंगकुन याने सामना ११-६, ९-११, १०-१२, १२-१०, १२-१०, ११-९ असा जिंकला. लीन शिदाँग जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी आहे. त्याने चौथ्या गेममध्ये ७-४ अशी आघाडी घेत मुसंडी मारण्याची प्रयत्न केला. मात्र जिंगकुन याने गुण मिळवत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. नंतर दोन्ही गेम जिंकताना त्याने शिदाँगला मोक्याच्या क्षणी चुका करण्यास भाग पाडले. जिंगकुन याने यापूर्वी डब्ल्यूटीटी स्पर्धेत २०२१ मध्ये दोन वेळा, तर २०२२ एक विजेतेपद मिळविले होते.

चिनी खेळाडूचे वर्चस्व

महिला गटातही चिनी खेळाडूचे वर्चस्व राहिले. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या वँग यिदी हिने तैवानच्या चेंग आय-चिंग हिला ३७ मिनिटांत ४-० (११-६, ११-६, ११-८, ११-४) असे सहजपणे नमविले. गतवर्षी आशिया कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या वँग हिने चतुरस्र खेळ आघाडी वाढवत नेली. गेल्या वर्षी बुडापेस्ट येथे विजेतेपद मिळविलेल्या वँग हिचे हे सलग दुसरे डब्ल्यूटीटी एकेरी जेतेपद ठरले.

कोरियन जोडी पुरुष दुहेरीत विजयी

पुरुष दुहेरीत कोरियाच्या ॲन जेएह्यून व चो सेऊंगमिन जोडीने विजेतेपद मिळविले. त्यांनी जपानच्या उदा युकिया टोगामी शुनसुके जोडीवर ३-१ (११-३, ९-११, १२-१०, ११-४) अशी मात केली.

चौदा वर्षीय खेळाडूचे यश

जपानची १४ वर्षीय मिवा हारिमोटो हिने महिलांच्या दुहेरीत वीस वर्षीय मिया नागासाकी हिच्या साथीत विजेतेपद मिळविले. त्यांनी तैवानच्या लि या-झून व चेंग आय-चिंग जोडीवर ३-० (११-९, ११-७, ११-६) अशी मात केली. मिवा हिने टोगामी शुनसुके याच्या साथीत मिश्र दुहेरीतही अंतिम फेरी गाठली होती, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

‘गोव्यातील स्पर्धा भारतासाठी भूषणावह’

पणजी - वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेचे आयोजन गोव्यासह भारतासाठी भूषणावह ठरले, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. समारोप सोहळ्यात केंद्रीयमंत्री अनुराग उपस्थित होते. स्तुपा स्पोर्ट्स ॲनालिटिक्स यांनी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ, भारतीय टेबल टेनिस महासंघ, गोवा सरकार यांच्या सहकार्याने स्पर्धा घेतली. ते म्हणाले, ‘डब्ल्यूटीटी स्पर्धेत जगभरातील प्रमुख टेबल टेनिसपटू सहभागी झाले. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील फॅन झेंगडाँग याच्यासह दोनशे खेळाडूंचा सहभाग होता, त्यात चाळीस खेळाडू भारतीय होते. स्पर्धेत जबरदस्त चुरस अनुभवायला मिळाली.’’ ते म्हणाले, की ‘‘भारतात १७ वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली, बुद्धिबळ ऑलिंपियाडनंतर आता डब्ल्यूटीटी स्पर्धेचे आयोजन सफल ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडाप्रेमी आहेत. त्यामुळे हे शक्य झाले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT