Shaheen Afridi Wasim Akram World Cup Final : ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी 20 वर्ल्डकप 2022 येत्या रविवारी अंतिम सामन्याने पुर्णत्वास येईल. टी 20 वर्ल्डकपची फायनल ही पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्याकडे 1992 मध्ये झालेल्या ड्रीम फायलच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. 1992 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा 22 धावांनी पराभव करून आपला पहिला वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी सामन्याचा हिरो वसिम अक्रमक ठरला होता. त्याने 10 षटकात 49 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
आता जवळापस 30 वर्षांनी पुन्हा एकदा वर्ल्डकप फायलनमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यावेळी वसिम अक्रमने कमाल केली होती. यावेळी पाकिस्तानी चाहते अशीच कमाल डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने देखील करावी अशी अपेक्षा करत आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने देखील जर पाकिस्तान वर्ल्डकप जिंकला तर त्यामध्ये शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीचा मोलाचा वाटा असणार आहे.
वर्ल्डकपमध्ये शाहीन आफ्रिदीची दमदार कामगिरी
ज्यावेळी वर्ल्डकप सुरू झाला त्यावेळी शाहीन आफ्रिदी दुखापतीतून नुकताच संघात परतला होता. त्यामुळे त्याला विकेट्स घेण्यात अपयश येत होते. मात्र जसजसा वर्ल्डकप पुढे सरकू लागला तसतशी शाहीनची कामगिरी खुलू लागली. सुपर 12 मधील पहिल्या दोन सामन्यात शाहीनला एकही विकेट घेतला आली नाही. मात्र त्यानंतर त्याने पुढच्या चार सामन्यात 10 विकेट्स घेत पाकिस्तानला फायलनमध्ये पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला.
शाहीनने नेदरलँडविरूद्ध 1, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 3, बांगलादेशविरूद्ध 4 आणि न्यूझीलंडविरूद्ध 2 विकेट्स घेतल्या. शाहीनने मोक्याच्या क्षणी पाकिस्तानसाठी दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत पोहचवले आहे. आता फायलनमध्ये इंग्लंडविरूद्ध देखील त्याच्याकडून अशाच कामगिरी अपेक्षा चाहते करत आहेत.
1992 च्या वर्ल्डकपमध्ये वसिम ठरला हिरो
1992 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला विजेतेपद मिळून देण्यात डावखुरा वेगवान गोलंदाज वसिम अक्रमचा सिंहाचा वाटा होता. त्याने संपूर्ण स्पर्धेत एकूण 10 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या. 1992 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान देखील वसिम अक्रमनेच मिळवला होता. इंग्लंडविरूद्धच्या फायनल सामन्यात देखील वसिम अक्रमकने इयान बॉथम, एलन लॅम्ब आणि क्रिस लुईसची विकेट घेतली होती. या कामगिरीच्या जोरावरच पाकिस्तानने आपल्या विजयाचा पाया रचला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.