Lionel Messi Retirement : अर्जेंटिनाचा कर्णधार रिओनेल मेस्सीने अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची वेळ आता जवळ आली आहे याचे संकेत दिले. त्याने गुरूवारी वक्तव्य केले की आगामी 2022 चा कतारमध्ये होणारा फिफा वर्ल्डकप हा त्याच्या कारकिर्दितील शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. (Lionel Messi Indication Of Retirement Says 2022 World Cup in Qatar will surely be the last In His Career)
35 वर्षाचा लिओनेल मेस्सी अर्जेंटिना येथे इएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'नक्कीच हा माझा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. मी शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त आहे. यंदाचे माझे हंगाम पूर्व सत्र चांगले गेले. गेल्यावर्षी मला ते करता आले नव्हते. मी माझा खेळाचा स्तर राखणे गरजेचे होते. मी आता चांगल्या मानसिक स्थितीत असून खूप आशावादी आहे.'
लिओनेल मेस्सीने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने अर्जेंटिनासाठी 164 गोल केले आहेत. मेस्सीकडे मेराडोना यांच्यानंतर अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देऊ शकणारा खेळाडू म्हणून पाहिले जाते. मात्र त्याला अजूनपर्यंत तरी अर्जेंटिनाला फिफा वर्ल्डकप जिंकून देता आलेला नाही. 2014 च्या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहचला होती. मात्र एक्स्ट्रा टाईम पर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाचा 1 - 0 असा पराभव केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.