Lionel Messi Argentina Witches  esakal
क्रीडा

Lionel Messi : मेस्सीला लागली 'दृष्ट', अर्जेंटिनातील सगळ्या चेटकीणी ट्विटरवर आल्या अन्...

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Argentina Witches : फिफा वर्ल्डकप फायनलला अवघे काही तास राहिले आहे. यंदाची फायनल ही अर्जेंटिना आणि गतविजेत्या फ्रान्स यांच्यात होणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आपले एकमेव अपुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. अर्जेंटिनासह त्याचे जगभरातील चाहते मेस्सीच्या हाताचे ठसे वर्ल्डकपवर उमटावा यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. तर तिकडे अर्जेंटिनामध्ये काही स्वयमघोषित चेटकीणींनी मिळून मेस्सीला लागलेली दृष्ट उतरवली असल्याचा दावा केला.

अर्जेंटिनाची स्वयमघोषित चेटकीण (जादूटोणा करणारी महिला) तसेच पार्ट टाईम बेबीसिटर असलेली मगाली मार्टिनेझला मेस्सीचे काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली होती. मेस्सी हा फुटबॉलच्या मैदानावर काहीसा गोंधळलेला दिसत होता. मार्टिनेझच्या मते मेस्सीवर कोणीतरी काळी जादू केली होती. त्याला दृष्ट लागली होती.

यानंतर ही स्वयमघोषित चेटकीण कामाला लागली. तिने आपले सर्व लक्ष मेस्सीवर केंद्रीत केले. ती सातत्याने प्रार्थना करत होती. आणि पाण्याच्या एका बाऊलमध्ये तेल शिंपडत होती. जर हे तेल नाहीसे झाले तर मेस्सी सुरक्षित आहे. तर ते बाऊलच्या मध्यावर गोळा व्हायला लागले तर तो शापित झाला आहे. मार्टिनेझ म्हणाली की हे तेल चुंबकासरख एकत्र येत होतं. मला माहिती होतं की मी एकटी मेस्सीला शापमुक्त करू शकणार नव्हते.

त्यामुळे मार्टिनेझने ट्विटरवर एक पोस्ट केली. तिने अर्जेंटिनामधील बाकीच्या चेटकीण भगिनींना आवाहन केले. 'माझ्या दृष्ट उतरवणाऱ्या चेटकीण भगिनींनो. मेस्सीला दृष्ट लागली आहे. मला तुमची मदत हवी आहे.' अशी पोस्ट मार्टिनेझने केली. हजारो लोकांनी तिचे हे ट्विट शेअर केले. अनेक जणांनी दावा केला की त्या देखील जादूटोणा करणाऱ्या महिला आहेत. त्या सगळ्या अर्जेंटिनाचा गोल्डन बॉयला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या सगळ्या अर्जेंटिनाच्या चेटकीण भगिनींच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून त्यांनी मेस्सीची दृष्ट काढण्यास सुरूवात केली आहे. ते व्हापासून अर्जेंटिना पराभूत झालेला नाही. अर्जेंटिना सौदी अरेबियाविरूद्ध हरल्यानंतर अर्जेंटिनातील या स्वयमघोषित चेटकीणींनी व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले. यावर त्यांनी आपल्या राष्ट्रीय संघाला कशी मदत करायची याच्या सुचना देण्यास सुरूवात केली.

टीप : दृष्ट लागल्याचा दावा करणे हा एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे. संघ चांगला खेळला की जिंकतो आणि वाईट खेळला की हरतो. अर्जेंटिना आणि मेस्सीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये झुंजार खेळ केला म्हणून ते फायनलमध्ये पोहचले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT