Euro 2024  Sakal
क्रीडा

Euro 2024 : तुर्कस्तानच्या विजयात गुलेरचा विक्रमी गोल; जॉर्जियावर ३-१ फरकाने मात

सकाळ वृत्तसेवा

डॉर्टमंड : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या जॉर्जियावर फ गट लढतीत तुर्कस्तानने ३-१ फरकाने मात केली, त्यात अर्दा गुलेर याचा गोल विक्रमी ठरला.गुलेर युरो करंडक इतिहासात वैयक्तिक पदार्पणातील सामन्यात गोल करणारा सर्वांत युवा ठरला.

जॉर्जियाविरुद्ध ६५व्या मिनिटास त्याने मध्यक्षेत्रातून मारलेल्या डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात खेळला तेव्हा गुलेरचे वय १९ वर्षे व ११४ दिवस इतके होते. २००४ मध्ये पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो करंडकातील वैयक्तिक पदार्पण गोल केला तेव्हा तो १९ वर्षे व १२८ दिवसांचा होता.

त्यापूर्वी, सामन्याच्या २५व्या मिनिटास मेर्त मुल्डूर याने तुर्कस्तानला आघाडी मिळवून दिली होती, मात्र दोन मिनिटानंतर आणखी एक १९ वर्षीय खेळाडू केनान यिल्डिझ याचा गोल व्हिडीओ असिस्टंट रेफरीद्वारे (व्हीएआर) ऑफसाईडमुळे अवैध ठरल्यामुळे तुर्किएची आघाडी वाढू शकली नाही. ३२व्या मिनिटास जॉर्जेस मिकौताझे याच्या गोलमुळे जॉर्जियाने बरोबरी साधली. जॉर्जियाचा हा युरो करंडकातील पहिलाच गोल ठरला.

सामन्याच्या भरपाई वेळमध्ये बरोबरीच्या प्रयत्नात गोलरक्षकासह जॉर्जियाचे सारे खेळाडू तुर्कस्तानच्या गोलक्षेत्रात आले. त्याचा लाभ उठवत प्रतिहल्ल्यावर ९०+७ व्या मिनिटास केरेम अक्तुरकोग्लू याने तुर्किएच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.

विक्रमी गोल केलेला गुलेर सामन्याचा मानकरी ठरला. `मला कसं वाटतंय याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाही, मी फक्त रोमांचित आहे. या गोलचे स्वप्न मी सातत्याने पाहिले होते,`

असे क्लब पातळीवर रेयाल माद्रिदचे प्रतिनिधित्व करणारा गुलेर म्हणाला. या विशिष्ट प्रकारच्या फटक्याचा मी हल्ली प्रशिक्षण सत्राच्या अखेरीस सराव करायचो, असे त्याने आपल्या सनसनाटी गोलविषयी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT