Virat Kohli esakal
क्रीडा

"...म्हणून कॅप्टन्सी गमावणं विराट कोहलीला सलत राहिल"

निवड समितीच्या सदस्यांचा या निर्णयामागे काय विचार आहे हे समजलं नाही.

सुशांत जाधव

भारतीय संघाचे (Team India) माजी क्रिकेटर मदन लाल (Madan Lal) यांनी विराट कोहली (Virat Kohli) ची वनडे कॅप्टन्सी काढून घेणं पटलेल नाही. विराट कोहलीने मेहनतीनं टीम तयार केली. त्यामुळे कर्णधारपद काढून घेतल्याची गोष्ट त्याच्या चांगलीच मनाला लागली असेल, असे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी (India Tour of South Africa 2021-22) कसोटी संघाची निवड करताना वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली.

हा निर्णय घेऊन दोन-तीन दिवस उलटले असतानाही यासंदर्भातीच चर्चा थांबण्याचे नाव दिसत नाही. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिल्यांचा नियमित कर्णधाराची भुमिका बजावताना दिसणार आहे. विराट कोहलीने टी 20 वर्ल्‍ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडले होते. वनडे आणि कसोटीतील त्याच्याकडील नेतृत्व कायम राहिल असे वाटत असताना बीसीसीआयने सर्वांनाच सरप्राईज दिले.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघातील स्प्लिट कॅप्टन्सीला थोड्याफार प्रमाणात विराट कोहली जबाबदार असल्याचे म्हटले होते. ज्यावेळी कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडले त्यावेळी या निर्णयावर पुन्हा विचार करण्यास त्याला सांगण्यात आले. पण कोहली आपल्या निर्णयावर कायम राहिला. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन कर्णधार हे समीकरण योग्य वाटत नसल्यामुळे बीसीसीआयला वनडेसाठी कोहलीच्या जागी रोहित शर्माची निवड करावी लागली, असे गांगुलींनी सांगितले होते.

आता मदन लाल (Madan Lal) यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया दिलीये, ते म्हणाले की, निवड समितीच्या सदस्यांचा या निर्णयामागे काय विचार आहे हे समजलं नाही. विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत होता. टी 20 मध्ये त्याने नेतृत्व सोडल्याची गोष्ट मला समजू शकते. पण मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी त्याच्याकडून काढून घेणं योग्य वाटत नाही. विराट कोहलीलाही ही गोष्ट सलत राहिल, असे मदन लाल यांनी म्हटले आहे.

2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत विराट कोहली टीम इंडियाच्या कर्णधारपदी राहिल, असे वाटत होते. पण बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावरुन हटवले आहे. ही गोष्ट न पटणारी आहे. एखाद्या संघाची बांधणी करणं जितकं कठिण असतं त्यापेक्षा सोप काम ती गोष्ट उद्धवस्त करणं असते, या शब्दांत त्यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कोहलीला पाठिंबा दिला आहेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT