सातारा ः महाराष्ट्राच्या पूर्वा पात्रेकर, सिया देवधर, शोमिरा बिडये, चैतन्या राजे यांनी बहारदार खेळाचे प्रदर्शन घडवत येथे सुरू झालेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या 65 व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत पश्चिम बंगाल संघास 65-30 असे नमविले.
अवश्य वाचा - चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षांखालील मुलींच्या 65 व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.
येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. माणिक ठोसरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर, शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राची थत्ते, के. एस. डी. शानभाग विद्यालयाच्या संचालिका आंचल घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. शामसुंदरी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक रमेश शानभाग यांनी आभार मानले.
हेही वाचा - महाबळेश्वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये
दरम्यान, उद्घाटनानंतर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यातील सामना एकतर्फी झाला. या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी खेळाच्या पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळ केला. मध्यंतरास महाराष्ट्र संघाकडे 44- 22 अशी आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवत संघाने 65-30 असा विजय मिळविला.
जल्लाेष जल्लाेष अन् फक्त जल्लाेषच
आज (गुरुवार) महाराष्ट्र विरुद्ध केरळ या सामन्यात महाराष्ट्र संघाने अतिरिक्त वेळेत 88 - 78 असा विजय मिळविला. निर्धारीत वेळेत दाेन्ही संघांचा गुणफलक 72-72 असा हाेता. पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्रच्या मुलींच्या संघाने जिगरबाज खेळ करुन सामना समान गुणफलकावर आणून ठेवल्याने त्यांचा विजय सुकर झाला. महाराष्ट्र संघाने सामना जिंकताच प्रेक्षकांनी मैदानावर जय भवानी जय शिवाजीच्या घाेषणा दिल्या.
जरुर वाचा - ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...
बॅंडपथक, सांस्कृतिक कार्यक्रमाने जिंकली मने
उद्घाटनाप्रसंगी खेळाडूंच्या मार्चपाससाठी महाराजा सयाजीराव विद्यालयाचे उत्तम बॅंडपथक उपलब्ध होते. अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, सातारा व यशवंतराव चव्हाण कॉलेज, सातारा यांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून देशातील विविध राज्यांतून आलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, तसेच व्यवस्थापकांची मने जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.