Maharashtra Kesari Kusti 2023 
क्रीडा

Maharashtra Kesari: माउली जमदाडेला पराभवाचा धक्का! पुण्याच्या प्रतीक जगतापला सुवर्णपदक

शुभम, सिकंदर यांची माती विभागातून आगेकूच

युवराज पाटील

Maharashtra Kesari Kusti 2023 : हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांनी गादी विभागातून; तर शुभम शिदनाळे याने माती विभागातून आगेकूच करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आगेकूच केली. वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माउली ऊर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला पराभूत करताना धक्कादायक निकाल नोंदवला.

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या पहिल्या लढतीत २०१९ महाराष्ट्र केसरी विजेता व नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने अहमदनगरच्या सुदर्शन कोतकरला ३-० असे पराभूत केले. पहिल्या दीड मिनिटांत दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली.

त्यानंतर मात्र सुदर्शन कोतकरला कुस्ती करण्याची ताकीद मिळाली; मात्र तो गुणांची कमाई करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला १ गुण देण्यात आला. दुसऱ्या फेरीतदेखील सुदर्शन कोतकरला ताकीद देण्यात आली. या वेळीही तो गुण मिळवण्यासाठी अपयशी ठरला. या वेळी हर्षवर्धनने हप्ते डावावर एका गुणाची कमाई केली. त्यानंतर हर्षवर्धनने सुदर्शनला वर्तुळाच्या बाहेर ढकलत एक गुण कमावताना लढत जिंकली.

गादी विभागात कल्याणच्या नरेश म्हात्रेने वाशीमच्या वैभव मानेला ४-२ असे पराभूत केले. पहिल्या फेरीतच नरेशने ३ गुणांची झटपट कमाई केली. दुसऱ्या फेरीत वैभवने आक्रमक खेळाला सुरुवात केली. पहिल्या १५ सेकंदातच वैभवने नरेशला वर्तुळाच्या बाहेर ढकलताना १ गुणाची कमाई केली; मात्र त्यानंतर १५ सेकंदाने नरेशने वैभवला मॅटच्या बाजूला ढकलताना पुन्हा ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोरदार प्रतिआक्रमण करत वैभवने एक गुण मिळवला, परंतु लढत जिंकण्यात वैभव अपयशी ठरला.

गादी नागपूरच्या राकेश देशमुखने यवतमाळच्या राजेश एकणारला १०-० असे पराभूत करताना आगेकूच केली. पहिल्या फेरीत राकेशने राजेशला वर्तुळाबाहेर ढकलत २ गुणांची कमाई केली. पुन्हा लढत सुरू झाल्यानंतर राकेशने भारंदाज डाव टाकताना चार गुणांची कमाई केली. त्यानंतर पुन्हा भारंदाजच डाव टाकत परत ४ गुणांची कमाई करताना लढत जिंकली.

माती विभागातून चुरशीच्या लढतीत वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माउली जमदाडेला ९-४ असे पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली. सुरुवातीलाच सिकंदरने माउलीवर ताबा घेताना २ गुण मिळवले. माउली जमदाडेने पहिल्याच प्रयत्नात दुहेरी पट काढताना थेट ४ गुणांची कमाई केली.

त्यानंतर सिकंदर शेखने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत माउलीचा ताबा घेत २ गुणांची कमाई केली. त्यानंतर माउली जमदाडेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हा डाव उलटून टाकताना सिकंदरने ४ गुणांची कमाई केली.

त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यात माउली जमदाडे याला वर्तुळाच्या बाहेर ढकलत सिकंदरने गुणाची कमाई करताना विजय मिळवला. माती विभागात कोल्हापूरच्या शुभम शिदनाळे याने ठाणेच्या अप्पा सरगरला चीतपट केले. लढतीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत शुभमने ३ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर शुभमने आप्पा सरगरला चितपट करताना विजय साकारला.

अंतिम निकाल

  • ८६ किलो वजनी गट माती विभाग

    • सुवर्ण : अर्जुन काळे, भंडारा

    • रौप्य : सचिन पाटील, वाशीम

    • ब्राँझ : राहुल काळे, सोलापूर

  • ८६ किलो वजनी गट : गादी विभाग

    • सुवर्ण : प्रतीक जगताप, पुणे

    • रौप्य : मुंतजिर सरनौबत, उस्मानाबाद

    • ब्राँझ : एकनाथ बदरे, सोलापूर, विजय डोईफोडे, सातारा

  • ५७ किलो वजनी गट माती विभाग

    • सुवर्ण : सौरभ इगवे, सोलापूर

    • रौप्य : रोहित तामखेडे, सांगली

    • ब्राँझ : ओमकार निगडे, पुणे जिल्हा

  • ५७ किलो वजनी गट गादी विभाग

    • सुवर्ण : अतिश तोडकर, बीड

    • रौप्य : सूरज अस्वले, कोल्हापूर

    • ब्राँझ : अतुल चेचर, कोल्हापूर व विजय मोदर, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT