Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. खेड तालुक्यातील शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी जिंकली. शिवराज हा शेतकरी कुटुंबातून येतो. तर महेंद्र गायकवाडला कुस्तीचा समृद्ध वारसा लाभला आहे.
हे दोघेही पैलवान प्रसिद्ध वस्ताद काका पवार यांचे शिष्य आहेत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती होते. दोन तुल्यबळ मित्रांच्या या लढतीत खेडच्या शिवराजनं बाजी मारली.
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड हे दोघेही काका पवार यांचे पैलवान आहेत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचे कच्चे दुवे आणि बलस्थान माहिती होती. अंतिम फेरीच्या सुरूवातीलाच दोघांनी काही काळ एकमेकांना आजमावून पाहिले. त्यानंतर शिवराज राक्षेने आक्रमक पवित्रा घेत महेंद्र गायकवाडवर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातच दोन गुण कमावाले.
त्यानंतर शिवराज राक्षेने आपली पकड मजबूत करत महेंद्र गायकवाडचा कच्चा दुवा हेरला अन् त्याला अवघ्या दोन मिनिटात अस्मान दाखवले. महाराष्ट्र केसरीची फायनल पहिल्या हाफमध्ये जिंकत शिवराजने महाराष्ट्र केसरीच्या चमचमत्या गदेवर आपले नाव कोरले. शिवराज हा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराजने कुस्तीचा वारसा लाभलेल्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले.
शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.
शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि 5 लाख रूपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर शिवराजला महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील पटकावली.
हेही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.