Maharashtra Kesari Competition esakal
क्रीडा

साताऱ्यात 'महाराष्ट्र केसरी'ला आखाडा पूजनानं सुरुवात

गिरीश चव्हाण

विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धांना आखाडा पूजनानं सुरुवात झालीय.

सातारा : काल (शुक्रवार) अवकाळी पावसामुळं (Heavy Rain in Satara) झालेली पडझड सावरत आज (शनिवार) सकाळी आठ वाजता महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती आणि गादी प्रकारामधील विविध वजनी गटातील कुस्ती स्पर्धांना आखाडा पूजनानं सुरुवात झालीय. या गटातील कुस्त्या संपल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील (Maharashtra Kesari Competition) उपांत्य फेरीमधील कुस्त्या घेण्यात येणार असून अंतिम लढत सायंकाळी होणार आहे.

सातारा शहरात काल अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. पावसामुळं शाहू स्टेडियम (Shahu Stadium) येथील कुस्ती मैदानाचं मोठं नुकसान झाल्यानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Competition) स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landage) यांनी दिली होती. मात्र, आज पुन्हा कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला आहे.

मागील चार दिवसांपासून तापमानाचा चढा पारा, सकाळपासूनच जाणवणारी उन्हाची तीव्रता, दिवसभर कडक ऊन आणि उकाडा यामुळं अंगाची लाही लाही होत होत असताना काल (शुक्रवार) दुपारी सातारा शहर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसानं एकूण किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, या पावसानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मात्र स्थगित कराव्या लागली होती. अचानक आलेल्या पावसामुळं ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा लाईटचा मंडप कोसळला, आखाड्यातील माती वाहून गेली. मॅट भिजले, स्टेडियममध्ये पाणी साठलं होतं. यामुळं स्पर्धा पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT