Shiv Chhatrapati Award  sakal
क्रीडा

Shiv Chhatrapati Award : वाड, वेंगसरकर, सुमारीवाला यांना जीवनगौरव; पुण्यातील २८ खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार; वितरण लवकरच

वितरण बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा नगरीत होणार असून तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॅडमिंटनमधील गुरुवर्य श्रीकांत वाड आणि अॅथलेटिक्स-मधील विख्यात असलेले आदिल सुमारीवाला, तसेच भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

वितरण बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा नगरीत होणार असून तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षांचे पुरस्कार रखडले होते. त्यामुळे आता २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अशा तीन वर्षांचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. जीवनगौरव ते दिव्यांग खेळाडू अशा एकूण ११७ जणांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासह या वेळच्या पुरस्कारांच्या यादीत आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना आयर्नमॅन हा किताबही मिळवला आहे.

दिव्यांग खेळाडू

२०१९-२० ः योगेश्वर घाटबांधे, भाग्यश्री माझिरे (अॅथलेटिक्स). मीनबहाद्दूर थापा (व्हिलचेअर बास्केटबॉल). आरती पाटील (बॅडमिंटन), मृणाली पांडे (बुद्धिबळ).

२०२०-२१ ः दीपक पाटील, वैष्णवी जगताप (जलतरण). सुरेश कार्की (व्हीलचेअर बास्केटबॉल), मिताली गायकवाड (पॅरा तिरंदाजी).

२०२१-२२ ः प्रणव देसाई, आकुताई उलभगत (अॅथलेटिक्स). अनिल काची (व्हिलचेअर बास्केटबॉल), अनुराधा सोळंकी (व्हिलचेअर तलवारबाजी). भाग्यश्री जाधव (अॅथलेटिक्स).

साहसी पुरस्कार ः २०१९-२० (जल) ः सागर कांबळे. (जमीन) ः कौस्तूभ राडकर. २०२०-२१ ः (जमीन) ः कृष्ण प्रकाश. केवल कक्का (थेट पुरस्कार). २०२१-२२ ः (जमीन) ः (जमीन) ः जितेंद्र गवारे.

मार्गदर्शक

२०१९-२० ः डॉ. आदित्य जोशी (जिम्नॅस्टिक, औरंगाबाद), शिरीन गोडबोले (खो-खो, पुणे), संजय भोसकर (नागपूर), प्रशांत चव्हाण (थेट पुरस्कार, कबड्डी), प्रताप शेट्टी (थेट पुरस्कार, कबड्डी), अमरसिंह निंबाळकर (थेट पुरस्कार, कुस्ती, पुणे). जिजामाता पुरस्कार ः दर्शना पंडित, नागपूर, सॉफ्टबॉल).

२०२०-२१ ः संजोग ढोले (जिम्नॅस्टिक, पुणे), राहुल राणे (स्केटिंग, पुणे), डॉ. अभिजित इंगोले (सॉफ्टबॉल, अमरावती), विनय साबळे (औरंगाबाद).

२०२१-२२ ः सिद्धार्थ कदम, (जिम्नॅस्टिक, औरंगाबाद), चंद्रकांत इलग (तिरंदाजी, बुलढाणा), किशोर चौधरी (सॉफ्टबॉल, जळगाव).

जीवन गौरव पुरस्कार

जीवनगौरव ः श्रीकांत वाड ( १९-२०, ठाणे), दिलीप वेंगसरकर (२०-२१)आदिल सुमारीवाला (२१-२२, मुंबई)

शिवछत्रपती पुरस्कार

२०१९-२० ः स्नेहल मांढरे (तिरंदाजी, सातारा), पारस पाटील (पुणे), अंकिता गोसावी (पुणे, अॅथलेटिक्स), विजयलक्ष्मण न्हावी, (जळगाव), शीतल शिंदे (उस्मानाबाद, आट्यापाट्या), तन्वी लाड (बॅडमिंटन, मुंबई उपनगर, थेट पुरस्कार).

सौरभ लेणेकर (मुष्टीयुद्ध, मुंबई उपनगर), प्रणिता सोमण (सायकलिंग, नगर). जय शर्मा (तलवारबाजी, नाशिक), सायली जाधव (कबड्डी, मुंबई उपनगर), सागर नागरे (कयाकिंग-कनॉईंग, नाशिक). प्रतीक वाईकर (पुणे), आरती कांबळे (खो-खो, रत्नागिरी), दीपक शिंदे (मुंबई उपनगर), प्रतीक्षा मोरे (मल्लखांब, थेट पुरस्कार, कोल्हापूर).

नाजुका घारे (पॉवरलिफ्टिंग, ठाणे). भक्ती खामकर (शुटींग, ठाणे), अरहंत जोशी (स्केटिंग, पुणे). श्रुतिका सरोदे (स्कटिंग, पुणे). अभिजित फिरके (सॉफ्टबॉल, अमरावती). हर्षदा कासार (सॉफ्टबॉल पुणे). सिद्धी मणेरीकर (क्लायबिंग, उपनगर), मिहिर आंब्रे (जलतरण, पुणे). साध्वी धुरी (जलतरण, पुणे), मेघाली रेडकर (उपनगर डायव्हिंग), अश्विनी मगळे (वेटलिफ्टिंग, कोल्हापूर). सोनबा गोंगाणे, सोनाली तोडकर (कुस्ती, बीड).

२०२०-२१ ः विशाल फिरके (जळगाव), शीतल ओव्हाळ (उस्मानाबाद, आट्यापाट्या). यशिका शिंदे (नेमबाजी, मुंबई शहर). स्वप्नाली वायदंडे (सॉफ्टबॉल, कोल्हापूर), रेश्मा पुणेकर, बेसबॉल, पुणे). मिताली वाणी (वुशू, पुणे), सूर्या थटू (पुणे), प्रियांका कारंडे (सायकलिंग, सांगली).

अजय सावंत (पुणे थेट पुस्कार, अश्वारोहण). नीलेश साळुंके (ठाणे), मीनल जाधव (उपनगर, कबड्डी). अक्षय भांगरे (उपनगर), प्रियंका भोपी ( खोखो, ठाणे). अथर्व कुलकर्णी (पुणे), आदिती धांडे (स्केटिंग, नागपूर). सिद्धेश पांडे (टेबल टेनिस, ठाणे). श्रेया बोर्डवेकर (पॉवरलिफ्टिंग, मुंबई शहर). अनिल मुंढे (कॅरम, पुणे), ऋतुजा तळेगावकर (जलतरण, नागूपर). सुरज कोकाटे (पुणे), कोमल गोळे (पुणे, कुस्ती).

२०२१-२२ ः मयूर रोकडे (सांगली), मोनाली जाधव (बुलढाणा, तिरंदाजी). सर्वेश कुशारे (नाशिक, अॅथलेटिक्स). अजित बुरे (वाशिम), वैष्णवी तुमसरे (भंडारा, आट्यापाट्या). मालविका बनसोड (नागपूर, बॅडमिंटन). हरिवंश टावरी (अकोला, मुष्टियुद्ध).

अक्षय आव्हाड (नगर), मंजुषा पगार (नाशिक, बेसबॉल). राजेश इरले (पुणे, शरीरसौष्ठव). देवेंद्र सुर्वे (पुणे, कनोइंग). संकल्प गुप्ता (नागपूर, थेट पुरस्कार, बुद्धिबळ). मयुरी लुटे (भंडारा, सायकलिंग). अभय शिंदे (औरंगाबाद), वैदेही लोहिया (औरंगाबाद, तलवारबाजी). अर्जुन कढे (पुणे टेनिस). ऋग्वेद

जोशी (औरंगाबाद, जिम्नॅस्टिक). अक्षय गणपुले (पुणे), अपेक्षा सुतार (रत्नागिरी, खो-खो). साहिल उतेकर (ठाणे), सोनल सावंत (कोल्हापूर, पॉवरलिफ्टिंग). नीलेश धोंडगे (नाशिक, रोइंग). भरत चव्हाण (मुंबई, रग्बी). अभिज्ञा पाटील (कोल्हापूर, नेमबाजी).

यश चिनावले (पुणे), कस्तुरी ताम्हणकर (नागपूर, स्केटिंग). सुमेध तळवेलकर (जळगाव, सॉफ्टबॉल). ऋतिक मारणे (पुणे), क्लायबिंग). ज्योती पाटील (मुंबई, जलतरण). संकेत सलगर (सांगली, वेटलिफ्टिंग). हर्षवर्धन सदगीर (पुणे), स्वाती शिंदे (कोल्हापूर, कुस्ती).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT