Maharashtra to organise mini Olympic in pune 
क्रीडा

मिनी ऑलिंपिक स्पर्धा पुण्यात! महाराष्ट्र शासनाकडून मान्यता

पुणे जिल्ह्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे रंगणार

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई : गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा अर्थातच मिनी ऑलिंपिकची चर्चा रंगत होती. अखेर शुक्रवारी, २७ मे रोजी या स्पर्धेचा बिगुल वाजला. या वर्षी ही स्पर्धा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे रंगणार आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या (एमओए)कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची कार्यकारिणी बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सहसचिव नामदेव शिरगावकर, खजिनदार धनंजय भोसले यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल व क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हेही याप्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक १८ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

होतकरू खेळाडूंना व्यासपीठ

मिनी ऑलिंपक स्पर्धेबाबत नामदेव शिरगावकर पुढे म्हणाले, ऑलिंपिक चळवळीबद्दल बरेच काही बोलले जाते. महाराष्ट्रात त्याची प्रथा सुरू करण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातून ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्‍वास पुढे त्यांनी व्यक्त केला.

१९ कोटींचा निधी

महाराष्ट्र शासनाकडून या स्पर्धेसाठी १९ कोटी ७ लक्ष व ९४ हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या स्पर्धेमध्ये ३२ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेसाठी खेळाडूंसह एकूण ९१०६ व्यक्ती सहभागी होतील.

सप्टेंबर महिन्यात होणार धमाका

‘सकाळ’ने याप्रसंगी नामदेव शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला. या वेळी ते म्हणाले, ‘‘स्पर्धेचा आराखडा तयार झाला आहे, पण जून महिन्यापासून महाराष्ट्रात पावसाळा सुरू होईल. त्यामुळे सध्या तरी ही स्पर्धा जून ते जुलै या कालावधीत घेता येणार नाही. सप्टेंबर या महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT