Paris Olympic 2024 India vs Romania in women Team Live : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ( Manika Batra) हिने जागतिक क्रमवातील १०व्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या बेर्नाडेट्टे शेजॉक्स हिचा पराभव करून धक्कादायक निकाल नोंदवला. भारत-रोमनिया सामना २-२ बरोबरीत असताना पुन्हा एकदा अनुभवी मनिकावर भारतीयांच्या अपेक्षाचे ओझे आले. मनिकाने आपल्या जबरदस्त खेळाने तो विश्वास सार्थ ठरवला आणि भारताला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला.
टेबल टेनिस गटात महिला सांघिक प्रकारात भारतासमोर रोमानियाचे आव्हान होते. दुहेरी गटाच्या पहिल्या सामन्यात भारताच्या अर्चना कामथ/श्रीजा अकुला या जोडीने रोमानियाच्या एलिझाबेथ समारा/एडिना डिएकोनू जोडीचा ११-९, १२-१०, ११-७ असा पराभव करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सर्वांच्या नजरा महिला एकेरीत मनिका आणि शेजॉक्स यांच्या लढतीकडे वळल्या. या सामन्यात रोमानियन खेळाडू सहज वर्चस्व गाजवेल, असा अनेकांचा अंदाज होता.
पण, मनिकाने सर्वांचे अंदाज चुकवले आणि ११-५, ११-७, ११-७ असा एकतर्फी विजय मिळवून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीजा अकुलाने कडवी टक्कर दिली. तिने एलिजाबेथला पाच गेमपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले. एलिजाबेथने १-२ अशा पिछाडीवरून ८-११, ११-४, ७-११, ११-६, ११-८ असा विजय मिळवत रोमानियाचे खाते उघडले.
महिला एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात शेजॉक्स व अर्चना कामथ यांच्यातला सामना दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा होता. भारताच्या अर्चनाने ०-१ अशा पिछाडीवरून १-१ अशी बरोबरी मिळवली. पण, रोमानियन खेळाडूने पुढील दोन्ही गेम ११-७, ११-९ असे जिंकून सामना २-२ असा बरोबरीत आणला.
आता सर्व मदार मनिकाच्या खांद्यावर होती आणि तिच्यासमोर एडिनाचे आव्हान होते. मनिकाने पहिला गेम ११-५ असा जिंकला.. रोमानियन खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु मनिकाने तिची आघाडी मोडून हा गेम ११-९ असा जिंकला. मनिकाला पंचांनी यावेळी वॉर्निंगही दिली होती. पण, त्याचं मानसिक दडपण न घेता मनिकाने तिसऱ्या गेममध्ये ८-५ अशी आघाडी घेतली. रोमानियाच्या एडिनाने पुनरागमनासाठी प्रयत्न केले, परंतु मनिकाने तिसऱ्या गेममध्ये ११-९ असा विजय मिळवून भारताची उपांत्यपूर्व फेरी पक्की केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.