Manoj Tiwary Retirement 
क्रीडा

Manoj Tiwary Retirement: टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, आता फक्त मंत्रिपदावर लक्ष केंद्रित!

Kiran Mahanavar

Manoj Tiwary Announces Retirement From All Forms of Cricket : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मनोज तिवारीने अचानक क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मनोज तिवारीने करिअरच्या सुरुवातीलाच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र तो टीम इंडियामध्ये जास्त काळ राहू शकला नाही.

मनोज तिवारी सध्या बंगालच्या ममता सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहेत. मनोज तिवारीला गेल्या 8 वर्षांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. गेल्या मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळला होता. बंगाल रणजीचा अंतिम सामना होता आणि उपविजेता ठरला होता. सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मनोज तिवारीने स्वत:चा एक फोटो ट्विट करून धन्यवाद लिहिले.

क्रिकेटरपासून राजकारणी बनलेल्या मनोज तिवारीने निवृत्तीनंतरची इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये शेअर केली आहे. मनोज तिवारीने लिहिले की, "क्रिकेटला अलविदा. या खेळाने मला सर्व काही दिले आहे, मला ते सर्व काही मिळाले आहे ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी या खेळाचा आणि देवाचा सदैव ऋणी राहीन, जो नेहमी माझ्या पाठीशी असतो. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या लहानपणापासून ते गेल्या वर्षापर्यंत माझ्या सर्व प्रशिक्षकांचे आभार.

मनोज तिवारीने 2015 साली टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. मनोज तिवारीने 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 होती. टी-20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर त्याने 15 च्या सरासरीने 5 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाशिवाय मनोज तिवारीही आयपीएल खेळला आहे. त्याची आयपीएलमधील आकडेवारी खूपच प्रभावी आहे. मनोज तिवारी हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघांचा भाग होता. यादरम्यान त्याने 98 सामन्यांत 28.72 च्या सरासरीने 1,695 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 7 अर्धशतकेही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT