मनू भाकरने रविवार 28 जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. हरियाणाची 22 वर्षीय नेमबाज मनू महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून या ऑलिम्पिक्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. ओ ये जिनने 243.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि किम येजीने 241.3 गुणांसह रौप्य पदक जिंकले. तर मनू तिसऱ्या स्थानी राहिली.
मनूने हे पदक जिंकल्यानंतर तिचे ट्विटरवरील एक ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झाले असून, ते ट्रेंडमध्ये आले आहे. ज्यामध्ये मनूने तिला दिल्ली विमानतळावर आलेला वाईट अनुभव सांगितला होता. हे ट्विट पुन्हा ट्रेंडिंगला आल्यानंतर अनेक युजर्स यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
स्टार महिला नेमबाज मनू भाकरने दिल्ली विमानतळावरील एअर इंडिया एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन आणि लाच मागितल्याचा आरोप केला आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, "विमानतळावर आपल्याला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले आणि जनावरांप्रमाणे वागणूक देण्यात आली."
दिल्लीहून मध्य प्रदेशात प्रशिक्षणासाठी जात असलेल्या मनूसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यावेळी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना हस्तक्षेप करावा लागला होता, त्यानंतर तिला विमानात प्रवेश मिळाला होता.
अनेक ट्विटमध्ये मनूने आरोप केला होता की, "डीजीसीएशी संबंधित सर्व वैध कागदपत्रे असूनही तिला विमानात प्रवेश दिला जात नाही." एअर इंडियाचे मनोज गुप्ता तिला विमानात जाऊ देत नसल्याचे मनूने लिहिले होते.
एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोपही मनूने केला होता. ट्विटरवर पीएम मोदी, अमित शाह, हरदीप सिंग पुरी आणि वसुंधरा राजे यांना टॅग करत तिने लिहिले होते की, "माझ्याकडून 10,200 रुपये लाच मागितले जात आहेत. मी लाच द्यावी का? माझ्याकडे दोन बंदुका आणि गोळ्या आहेत. मी विमानतळावर वाट पाहत आहे."
मूनने पुढच्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, "मनोज गुप्ता हे माणसासारखे वागत नाहीत. हे अस्वीकार्य आहे. ते मला गुन्हेगारासारखे वागवत आहेत. त्यांच्या सुरक्षा प्रभारींचाही असाच दृष्टिकोन आहे. अशा लोकांना सभ्यपणे वागण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले पाहिजे. विमान वाहतूक मंत्रालय या लोकांना शोधून योग्य ठिकाणी घेऊन जाईल."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.