Manu Bhaker Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: भगवद गीतेतील तो प्रसंग काल वाचला अन् आज...! मनू भाकर ऐतिहासिक मेडल जिंकल्यानंतर काय म्हणाली?

Manu Bhaker Won Medal: भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकून दिल्यानंतर मनू भाकरने भगवद गीतेचाही उल्लेख केला. ती काय म्हणाली जाणून घ्या

Pranali Kodre

Manu Bhaker won Medal in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रविवारी भारताचं पदकांचं खातं उघडलं. भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदकावर नाव कोरले. तिने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

मनू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे. भारतासाठी यापूर्वी राज्यवर्धन सिंग राठोड (२००४), अभिनव बिंद्रा (२००८), विजय कुमार (२०१२) आणि गगन नारंग (२०१२) या चार पुरुष नेमबाजांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे.

हे पदक जिंकल्यानंतर मनू म्हणाली, 'मला खूप छान वाटत आहे. मी खूप मेहनत घेतली होती. मी माझ्या पूर्ण उर्जेने खेळत होते. कांस्य पदक जिंकले असले, तरी मला आनंद आहे मी देशासाठी जिंकू शकले.'

याशिवाय ती म्हणाली, 'मी भगवद गीता खूप वाचते, काल अंतिम फेरीपूर्वी अर्जूनाला श्रीकृष्ण त्याचा धर्म काय आहे हे सांगतात, हा अध्याय वाचत होते. त्यात सांगितलंय की तुमचं कर्म करत राहा, बाकीचा विचार करू नका. मी तेच केलं. मी फक्त त्याक्षणी जे करू शकत होते, त्यावरच लक्ष केंद्रित केले होते. माझ्याकडे निकालाबद्दल विचार करायला नंतर पूर्ण वेळ होता. '

तिनं असंही सांगितलं की ती शांत राहुन तिचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होती.

मनू भाकर तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदक जिंकू शकली असती. मात्र मोक्याच्या क्षणी तिच्या पिस्तुलममध्ये बिघाड झाला, त्याचा फटका तिला बसला होता. पण तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र बाजी मारली.

ती याबाबत म्हणाली, 'टोकियोनंतर मी खूप निराश झाले होते. मला त्यातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागला. त्याचा परिणाम माझ्या काही स्पर्धांमधील कामगिरीवरही झाला. पण मला आनंद आहे की मी पुन्हा मजबुतीने उभी राहिली. सर्व श्रेय माझ्या प्रशिक्षकांचं, मार्गदर्शकांचं, कुटुंबाचं आणि मित्रपरिवाराचं आहे.'

मनूने यापूर्वी आशियाई क्रिडा स्पर्धेत, वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT