Manu Bhaker Coach Samaresh Jung Gets Demolition Notice sakal
क्रीडा

Manu Bhaker : मनू भाकरने देशाची शान वाढवली, पण तिच्या 'गुरू'च्या घरावर चालणार बुलडोझर; जाणून घ्या प्रकरण

Manu Bhaker Coach Samaresh Jung Gets Demolition Notice : मनू भाकर 3 ऑगस्ट रोजी महिलांच्या 25 मीटर पिस्तुलची अंतिम लढत खेळणार आहे. यापूर्वी मनू भाकरचे प्रशिक्षक समरेश जंग त्यांच्या घरावर बुलडोझर चालवल्याबद्दल नोटीस मिळाली आहे....

Kiran Mahanavar

Samaresh Jung Gets Demolition Notice : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सातव्या दिवसापर्यंत भारताने तीन पदके जिंकली होती, आणि तिन्ही पदके नेमबाजीतून आली आहेत. नेमबाज मनू भाकरने दोन कांस्यपदके जिंकली, त्यामुळे संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे.

मनू भाकरने पुन्हा एकदा एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यावेळी तिने महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, देशाला तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. दरम्यान, मनू भाकरचे प्रशिक्षक समरेश जंग अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर चालू शकतो.

ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकेरचे प्रशिक्षक समरेश जंग यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीच्या भूमी आणि विकास कार्यालयाने त्यांना दोन दिवसांत घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली आहे. ही जमीन संरक्षण मंत्रालयाची असल्याचे कार्यालयाचे म्हणणे आहे. जंग राहत असलेली वसाहत बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. दोन दिवसांत ते पाडले जाईल.

समरेश जंग यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, "भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्याच्या आनंदानंतर, मी प्रशिक्षक म्हणून ऑलिम्पिकमधून घरी परतलो आहे आणि मला दु:खद बातमी मिळाली आहे की माझे घर आणि संपूर्ण वसाहत दोन दिवसांत उध्वस्त केल्या जाणार आहे."

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "तुम्हाला जमीनदोस्त करण्याची मोहीम राबवायची आहे, पण ती योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे आणि लोकांना वेळ द्यायला हवा. एखादी व्यक्ती फक्त एका दिवसात घर कसे रिकामी करू शकते?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा समाजाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात! उमेदवार कधी घोषित करणार? जरांगेंनी यादीची तारीख सांगितली!

Who is Tejal Hasabnis: पुण्याच्या लेकीचं न्यूझीलंडविरुद्ध दिसलं 'तेज'! भारतासाठी पदार्पण करणारी कोण आहे तेजल?

NCP Vidhan Sabha List: शरद पवारांचे 'हे' आहेत तरुण तुर्क शिलेदार, पहिल्यांदाच मिळाली संधी; कोण आहेत? वाचा यादी

Sharad Pawar Candidate List: पवारांनी फिरवली भाकरी; युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Latest Maharashtra News Updates live : पर्वतीची जागा राष्ट्रवादीकडेच - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT