manu bhaker wins bronze medal olympics 2024  sakal
क्रीडा

Manu Bhaker : इंस्टाग्रामवर फक्त 10 मिनिटे... गुरु जसपाल राणाचा 'तो' गुरुमंत्र ठरला मनूसाठी किंगमेकर, काही महिन्यांपूर्वीच...

Kiran Mahanavar

Manu Bhaker's Coach Jaspal Rana : भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. मनू भाकरने पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे पदकाचे खाते उघडले.

मनू भाकरसाठी गेली तीन वर्षे चढ-उतारांची होती पण आज कुठे तरी तिला फळ मिळाले आहे. मनूचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. पण जसपाल राणा राष्ट्रीय प्रशिक्षक असताना त्यांचा मनू भाकरसोबत मोठा वाद झाला होता.

मनूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, पण एकाही स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो पोहोचू शकला नाही. यानंतर मनू पुन्हा जसपाल राणासोबत जोडली गेली. यानंतर एक प्रवास सुरू झाला जो ऑलिम्पिकच्या व्यासपीठापर्यंत पोहोचला.

सोशल मीडियापासून दूर राहण्याचा दिला सल्ला

जसपाल राणा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की गेल्या तीन वर्षांत त्यांनी मनू भाकरसोबत काय बदल केले. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मनूला इन्स्टाग्रामपासून दूर राहण्यास सांगितले होते, परंतु कधीही जबरदस्ती केली नाही. त्याच्या मते, कोणताही खेळाडू हे स्वतःसाठी करतो. कोणी काहीही बोलून उपयोग नाही.

इंस्टाग्रामवर फक्त 10 मिनिट

जसपाल राणा यांनी सांगितले की, मनू भाकरने ठरवले की ती ऑलिम्पिकपर्यंत दिवसातून फक्त 10 मिनिटे इंस्टाग्राम वापरायची. यानंतर, उर्वरित वेळ ती शूटिंगवर लक्ष केंद्रित करेल. जसपाल यांच्या मते, सोशल मीडियाचा खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

पिस्तुल दुरुस्त करण्याचे दिले प्रशिक्षण

टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता स्पर्धेत मनू भाकरची पिस्तूल अडकली होती. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम झाला. ही अडचण दूर करण्यासाठी जसपाल राणाने तिला यावेळी पिस्तुल दुरूस्तीचेही प्रशिक्षण दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT