Marnus Labuschagne Ashes Series 5th Test : इंग्लंडच्या किनिंग्टन ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वा अॅशेस कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला पहिल्या डावात सावध सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेने तर कळस गाठला. त्याने एवढी संथ फलंदाजी केली सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Marnus Labuschagne Slow Inning)
17 व्या षटकात ज्यावेळी ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली त्यावेळी त्यांच्या 49 धावा झाल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्नस लाबुशन 43 व्या षटकात बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया फक्त 91 धावांपर्यंतच पोहचला होता. म्हणजे कांगारूंना या 26 षटकात फक्त 40 धावा केल्या. मार्नस तर 82 चेंडू खेळून फक्त 9 धावा करून बाद झाला. त्याने 0.10 च्या सरासरीने धावा केल्या.
मार्नस लाबुशेन हा कॉफी लव्हर आहे. मध्यंतरी भारताच्या दौऱ्यावर येताना त्याने ऑस्ट्रेलियातून कॉफी बिन्सच्या अनेक बॅग्स घेऊन आला होता. सोबत कॉफी मशिन देखील होती. यावेळी त्याचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते. मात्र आता इंग्लंडमध्ये पाचव्या अॅशेस कसोटीत केलेली संथ फलंदाजी पाहून लाबुशेन ती कॉफीची पॅकेट्स ऑस्ट्रेलियातच विसरून तर आला नाही ना असा प्रश्न पडतो. (Marnus Labuschagne Coffee Lover)
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 283 धावात संपवला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक 85 धावा केल्या तर डकेटने 41 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव सावधगिरीने सुरू केला.
सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरने 49 धावांची सलामी दिली. मात्र ख्रिस वोक्सने वॉर्नरला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेनने सावध फलंदाजी करण्याचा पवित्रा अवलंबला. दुसरीकडे उस्मान ख्वाजाने देखील एक बाजू लावून धरली होती. मात्र मार्नस 82 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 बाद 115 धावा केल्या होत्या. ख्वाजा 152 चेंडूत नाबाद 47 धावा करून नाबाद होता तर स्टीव्ह स्मिथने 13 धावा केल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.