Medal hopes raised in badminton pv sindhu lakshya sen paris olympic 2024 sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : बॅडमिंटनमध्ये मेडलच्या आशा वाढल्या! सिंधू, सेनची बाद फेरीत धडक

दोन वेळा ऑलिंपिक पदक पटकावणारी पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीत भारताचे आशास्थान असलेला लक्ष्य सेन यांनी पॅरिस ऑलिंपिकचा बुधवारचा दिवस गाजवला.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : दोन वेळा ऑलिंपिक पदक पटकावणारी पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीत भारताचे आशास्थान असलेला लक्ष्य सेन यांनी पॅरिस ऑलिंपिकचा बुधवारचा दिवस गाजवला. सिंधू हिने इस्तोनियाच्या क्रिस्तीन क्युबा हिला २१-५, २१-१० असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.

लक्ष्य याने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्ती याच्यावर मात केली. सिंधू व लक्ष्य यांनी अंतिम १६ फेरीत प्रवेश केला. यापुढे बाद फेरी असल्यामुळे प्रत्येक लढत अटीतटीची असणार आहे. भारताची बॅडमिंटनमधील पदकाची आशा कायम आहे.

पी. व्ही. सिंधू हिच्यासमोर तुलनेने कमकुवत आव्हान होते. तिने तिच्या प्रतिमेला साजेसा खेळ केला. पहिल्या गेममध्ये सिंधूच्या आक्रमक खेळापुढे क्युबाचा निभाव लागला नाही. सिंधूने हा गेम २१-५ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये क्युबाकडून थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सिंधूसमोर तिला तग धरता आला नाही. अखेर सिंधूने हा गेम २१-१० असा जिंकत एम गटामध्ये दोन गुणांसह पहिले स्थान पटकावले व उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

माझ्या गटात पहिले स्थान पटकावण्याचा आनंद आहे. आता दोन विजयांमुळे कमवलेला आत्मविश्‍वास आगामी लढतींमध्ये कामाला येईल. पुढील फेरीमध्ये मला ही बिंगजिओ हिच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे. आगामी लढतींमध्ये खडतर आव्हान असेल. मला १०० टक्के सज्ज रहावे लागणार आहे.

- पी. व्ही. सिंधू, महिला बॅडमिंटनपटू, भारत

पहिल्या गेममध्ये संघर्ष

लक्ष्य सेन - जोनाथन ख्रिस्ती यांच्यामधील लढतीतील पहिल्या गेममध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. ख्रिस्ती याने सलग पाच गुण मिळवत लक्ष्यवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ८-२ असा पिछाडीवर असलेल्या लक्ष्य याने झोकात पुनरागमन करीत ८-८ अशी बरोबरी केली. त्यानंतर १८-१८ अशी बरोबरी होईपर्यंत दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

त्यानंतर लक्ष्य याने अखेरचे तीन गुण कमवताना उल्लेखनीय कामगिरी केली. लक्ष्यने दूरवरून मारलेला फटका ख्रिस्ती याने सोडून दिला. त्याला वाटले शटलकॉक रेषेबाहेर जाईल; पण तसे झाले नाही. लक्ष्यला हा गुण मिळाला.

त्याने १९-१८ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर ख्रिस्तीकडे गुण मिळवण्याची संधी असताना लक्ष्य याने उजव्या हातामध्ये असलेले रॅकेट पाठीमागून डाव्या बाजूला आणले आणि शटलकॉक परतवून लावले व महत्त्वाचा गुण मिळवला. २०-१८ असे पुढे गेल्यानंतर पहिला गेमसाठी हवा असलेला विजयी गुण त्याने सहज मिळवत आश्‍वासक सुरुवात केली. त्यानंतर दुसरा गेम २१-१२ असा जिंकून लक्ष्यने बाद फेरीत पाऊल ठेवले.

पुढील सामन्यासाठी सज्ज

पहिला सामना खडतर होता. पहिला गेम महत्त्वाचा होता. लवकरात लवकर फॉर्म मिळवणे गरजेचे होते. काही गुण मिळवण्याची गरज होती. आजच्या खेळाने मी आनंदी आहे. आता या वातावरणाशी जुळवून घेता आले आहे. पुढल्या सामन्यासाठी सज्ज झालो आहे, असे लक्ष्य सेन लढतीनंतर म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : 'रात्रीचे खेळ सांगायला आम्हाला भाग पाडू नका'; आमदार जयकुमार गोरेंचा कोणाला इशारा?

Latest Maharashtra News Updates :सोशल मीडिया इन्फ्लून्सरवर पोलिसांची कारवाई; चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याचे प्रकरण अंगावर

IND vs SA : आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात Axar Patel चा अफलातून कॅच; करून दिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची आठवण

BSNL IFTV : BSNLने सुरु केली पहिली इंट्रानेट टीव्ही सेवा; 500+ लाईव्ह चॅनेल्स अन् OTT प्लॅटफॉर्म्सचं कनेक्शन कसं घ्यायचं? वाचा

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT