BCCI Media Rights Tender : बीसीसीआय भारताच्या सामन्यांचे प्रसारण हक्क ( Media Rights Tender) विकण्यासाठीचे टेंडर काढण्यात उशीर करत आहे. बीसीसीआय हे झी आणि सोनीच्या मर्जरसाठी थांबले आहे अशी माहिती समोर येत होती. मात्र बीसीसीआय सध्या प्रसारण हक्क विक्रीच्या टेंडर न काढण्यामागे आयपीएलचा यंदाचा हंगाम असल्याचे कळते.
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या बातमीनुसार ब्रॉडकास्टर्समध्ये बेस प्राईसवरून भितीचे वातावरण आहे. कारण बीसीसीआय टीम इंडियाच्या सामन्यांसाठी आयपीएल सामन्यापेक्षाही जास्त बेस प्राईसला प्रक्षेपण हक्क विक्री करण्यास इच्छुक आहे. आयपीएलच्या एका सामन्याचे मुल्य हे 118 कोटी इतके होते.
बीसीसीआयने सबुरीची रणनिती अवलंबली आहे. ते झी आणि सोनीच्या मर्जरसाठी थांबले आहेत. त्यानंतर ते प्रक्षेपण हक्क विकण्याचे टेंडर काढतील. असे वृत्त होते. मात्र परिस्थिती तशी नाही. वनडे आणि कसोटी क्रिकेटची व्ह्यूवरशिप संपत चालली आहे ते पाहता भारतीय ब्रॉडकास्टरचा प्रत्येक सामन्याला भली मोठी रक्कम देण्यात रस नाहीये.
सुरूवातीच्या मार्केटचे मुल्यमापनात नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर बीसीसीआय आता आपल्या बेस प्राईसवर नव्याने काम करत आहे. ज्यावेळी ब्रॉडकास्टर्स आणि बीसीसीआय याबाबत सहमत असतील त्यावेळी टेंडर काढण्यात येईल.
गेल्यावेळच्या मीडिया राईट्स डीलनुसार भारतातील मायदेशातील सामन्याचे मुल्यांकन ही जवळपास 60 कोटीच्या आसपास होते. डिस्ने प्लस स्टारने पाच वर्षाच्या सायकलमधील 103 सामन्यांसाठी 6138.1 कोटी रूपये दिले होते.
भारताच्या प्रत्येक क्रिकेट सामन्यासाठी 2018 ते 2023 मध्ये किती रक्कम मोजली?
2018 ते 19, 46 कोटी प्रती सामना
2019 ते 20, 47 कोटी प्रती सामना
2020 ते 21, 46 कोटी प्रती सामना
2021 ते 22, 77 कोटी प्रती सामना
2022 ते 23, 78.90 कोटी प्रती सामना
बीसीसीआयला आयपीएलच्या 410 सामन्यासाठी मीडिया राईट्समधून 48,390 कोटी रूपये मिळाले होते. प्रती सामना याची किंमत 118 कोटी रूपयापर्यंत पोहचली. जरी पाच वर्षाच्या सायकलमध्ये 370 सामने असले तरी बीसीसीआयला सध्याच्या सायकलमध्ये 84 ते 94 सामने वाढवण्याबा करण्याबाबत विचार करावा लागणार आहे.
बीसीसीआयला भारतीय सामन्याच्या बाबतीत 100 सामन्यांसाठी जवळपास 15000 कोटी रूपये मिळतील अशी अपेक्षा आहे. जर तसं झालं तर प्रती सामना मीडिया राईट्सची किंमत ही 150 कोटी रूपयांपर्यंत जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.