Michael Vaughan Ben Stokes Virat Kohli : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केल्यानंतर क्रिकेट जगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा सामना अनिर्णितच राहील असे सर्वांना वाटत होते. मात्र इंग्लंडने आपला दुसरा डाव लवकर घोषित करत धोका पत्करला मात्र त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांनी पहिली कसोटी पाचव्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात जिंकली. या कसोटीत एकूण 1768 धावा झाल्या. तर 37 विकेट्स पडल्या. 7 फलंदाजांनी शतक देखील ठोकले. पाकिस्तानला विजयासाठी 100 षटकात 343 धावांचे आव्हान होते.
दरम्यान, बेन स्टोक्सच्या इंग्लंडचा दुसरा डाव लवकर घोषित करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील बेन स्टोक्सच्या या निर्णयाची स्तुती केली. मात्र त्याच्या या स्तुतीत गर्वाचा दर्प येत होता. त्याने ट्विट केले की, 'मी कोणत्याही कसोटी संघाच्या कर्णधाराला अशा पद्धतीने आपल्या संघाला फलंदाजी करण्यास सांगताना पाहिलेले नाही. ज्या प्रकारे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने डाव घोषित केला ते अविश्वसनीय होतं.'
वॉनच्या या बढाया मारणाऱ्या ट्विटचा भारतीय क्रिकेट चाहत्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची आठवण वॉनला करून दिली. एका चाहत्याने लॉर्ड्सवरील कसोटीचा तर दुसऱ्याने एडिलेड कसोटीची आठवण वॉनला करून दिली. विराटने लॉर्ड्स कसोटी आपल्या आक्रमक डावपेचांनी रंजक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.