Pakistan Team Mickey Arthur 
क्रीडा

Pakistan Team: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन कोच! पाकिस्तानने का घेतला हा विचित्र निर्णय?

Kiran Mahanavar

Pakistan Team Mickey Arthur : शाळा, कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी ऑनलाइन कोचिंग घेतात. पण आता क्रीडाविश्वातही ऑनलाइन कोचिंग सुरू होणार आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मिकी आर्थरला आपल्या टीमचे ऑनलाइन प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकते. असे झाल्यास मिकी आर्थर हे जगातील पहिले ऑनलाइन मुख्य प्रशिक्षक असतील.

मिकी आर्थरने पीसीबीला आश्वासन दिले आहे की, तो ऑनलाइन उपलब्ध असेल पण भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात सामील होईल. आर्थर सध्या क्रिकेटचे प्रमुख म्हणून डर्बीशायर संघाशी संबंधित आहे. मिकी आर्थरने 2025 पर्यंत हा करार केला आहे. डर्बीशायरमध्ये जाण्यासाठी आर्थरने 2021 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले.

पाकिस्तानचे कोचिंग करताना तो डर्बीशायर काउंटीसोबत आपली जबाबदारी पार पाडत राहील. 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक म्हणून मिकी आर्थरचे नाव पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहे. पीसीबीचे नवे प्रमुख नजम सेठी पुन्हा एकदा आर्थर यांना पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक बनवण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत मिकी आर्थरला आकर्षित करण्यासाठी पीसीबीने ऑनलाइन कोचिंगला सहमती दर्शवली आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ऑनलाइन प्रशिक्षक नियुक्तीबद्दल नजम सेठी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'राष्ट्रीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकाची ऑनलाइन कोचिंग ही संकल्पना समजण्यापलीकडची आहे. एकच परदेशी प्रशिक्षक का आवश्यक? प्रत्येक युगात, पाकिस्तान क्रिकेट राखण्यासाठी कर्णधाराच्या वैयक्तिक आवडी-निवडी असतात.

अनुभवी फिरकीपटू सकलेन मुश्ताक सध्या पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, पण त्याचा करार लवकरच संपणार आहे. मिस्बाह अल हक आणि वकार युनूस यांच्या राजीनाम्यानंतर, सकलेन मुश्ताकने 2021 टी-20 विश्वचषकापूर्वी या पदाची सूत्रे हाती घेतली. मॅथ्यू हेडन 2021 आणि 2022 च्या T20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघाशी फलंदाजी सल्लागार म्हणूनही संबंधित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT