nirmal kaur and milkha singh and  ANI
क्रीडा

ही कसली शर्यत मिल्खाजी! पत्नी पाठोपाठ घेतला जगाचा निरोप

आठवड्याभरात देशाने दोन दिग्गज खेळाडू गमावले.

सुशांत जाधव

आयुष्यातील कठीण अडथळ्यांची शर्यत पार करत खेळाच्या मैदानात देशाची मान जगभरात उंचावणाऱ्या मिल्खा सिंग यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीये. 13 जून रोजी त्यांच्या पत्नी निर्मल कौर (Nirmal Kaur) यांनी त्यांची साथ सोडली. त्या कोरोनाच्या बळी ठरल्या. त्यांच्यापाठोपाठ अवघ्या काही दिवसांत मिल्खा सिंगही आपल्यातून निघून गेले. आठवड्याभरात देशाने दोन दिग्गज खेळाडू गमावले. मिल्खा यांच्या पत्नी निर्मल कौर यांनी भारतीय महिला हॉलीबॉल संघाचे नेतृत्व केले होते. कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांनी मोहालीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या गोष्टीला आठवडाही झाला नसताना मिल्खा सिंग यांच्या निधनाची वार्ता आली. (Milkha Singh And Nirmal Kaur Love Story Started In Foreign Covid 19 Spoiled Athlete Couple 58 Year Life In-Week)

मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांची पहिली भेट 1955 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे झाली. दोघेही आपापल्या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करत होते. एका व्यावसायिकांने दोघांना भोजनासाठी निमंत्रित केले. या पहिल्या भेटीत मिल्खा सिंग निर्मल कौर यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर तीन वर्षानंतर 1958 मध्ये दोघांची पुन्हा भेट झाली. 1960 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवरील स्पर्धेपासून दोन दिग्गज खेळाडूंमधील प्रेम कहाणीला सुरुवात झाली. निर्मल कौर यांच्या घरातल्यांना मिल्खा सिंग यांच्यासोबत मुलीचे नाते रुचणारे नव्हते. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह कैरोन यांनी निर्मल कौर यांच्या घरच्यांची समजूत काढली आणि दिग्गज खेळांडू 1962 मध्ये विवाहबद्ध झाले. कोरोनाने 58 वर्षांची या दोघांची साथ तोडली. आणि एकाच आठवड्यात दोन्हीही दिग्गज खेळाडू आपल्यातून निघून गेले.

एखाद्या अ‍ॅथलेटला आयुष्यातील प्रत्येक स्टेशनवर प्रेम होत असते, असे मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यांच्या आयुष्यातही तीन तरुणी आल्या. यातील एक नाव हे ऑस्ट्रेलियन अ‍ॅथलेट बेट्टी कथबर्ट या दिग्गज धाविकेच होते. बेट्टी कथबर्ट यांना त्याकाळात ऑस्ट्रेलियात गोल्डन गर्ल म्हणून ओळखले जायचे. 1956 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवेळी मिल्खा सिंग 18 वर्षीय बेट्टी कथवर्ट यांना भेटले होते. मिल्खा सिंग यांची पगडी बांधण्याची शैली बेट्टी यांना खूपच भावली होती. बेट्टी यांनी त्यांच्याकडून पगडीही बांधून घेतली होती. 1960 मध्ये ऑलिम्पिक गेम्समध्ये दोघांची पुन्हा भेट झाली. पण त्यानंतर भेटीचा सिलसिला पुढे गेलाच नाही. 2006 मध्ये मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्सवेळी मिल्खा यांनी बेट्टी यांना कॉल केला त्यावेळी त्यांच्या मुलाने कॉल उचलला. त्यावेळी त्यांना बेट्टी यांचे कॅन्सरने निधन झाल्याचे समजले. बेट्टी कथवर्ट यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मिल्खा सिंग यांची ती पहिल्या भेटीत बांधून दिलेली पगडी आपल्यासोबत ठेवली होती. जी प्रेमाची एक निशाणी होती. मिल्खा सिंग यांचे पहिले प्रेम हे त्यांच्या गावातील एका तरुणीवर होते. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'भाग मिल्खा भाग'... चित्रपटात सोनम कपूरने या तरुणीची भूमिका साकारल्याचे दिसले होते.

मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या आयुष्यात पत्नी निर्मल कौर यांचे स्थान मोलाचे असल्याचे म्हटले होते. मी केवळ 10 वी पास आहे. मुलांच्या संगोपनासह त्यांना सुशिक्षित आणि संस्कारी बनवण्याचे श्रेय ते निर्मल यांना द्यायचे. आपल्या पत्नीला ते ऊर्जा स्त्रोत मानायचे. त्या निघून गेल्यानंतर ते ही आज आपल्यातून निघू गेले. मन हेलावून सोडणारी ही कसली शर्यत मिल्खाजी! अशीच काहीशी भावना मिल्खा सिंग यांना प्रेरणास्थान मानणाऱ्या प्रत्येकाची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT