Lifter Mirabai Chanu wins India's first gold medal in Birmingham sakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : मीराबाई चानूची 'गोल्डन' कामगिरी, भारताला पहिलं सुवर्णपदक

मीराबाई चानूने स्नॅचमध्ये तिचा ऑलिम्पिक विक्रम मोडला

Kiran Mahanavar

Mirabai Chanu Wins Gold : मीराबाई चानूने भारताला राष्ट्रकुल 2022 चे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूची 'गोल्डन' कामगिरी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे. त्याने एकूण 201 किलो वजन उचलून विक्रमी सुवर्णपदक जिंकले. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले आणि खेळाचा विक्रमही केला. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने राष्ट्रकुल आणि स्नॅचमध्ये हा खेळ विक्रम केला. (Lifter Mirabai Chanu wins India's first gold medal in Birmingham)

चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम केला. चानूला क्लीन अँड जर्कमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलायचे होते, पण या प्रयत्नात तिला यश मिळू शकले नाही.

मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक-2022 मध्ये 49 किलो वजनी गटात भारताला पहिले रौप्य पदक जिंकून दिले. त्यांच्या आधी कर्णम मल्लेश्वरी यांनी 2000 मध्ये ही कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. 2014 मध्ये झालेल्या या खेळांमध्ये तिला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. याशिवाय चानूने 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

मीराबाई चानूचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. ती मणिपूरची राजधानी इंफाळमधील नॉन्गपोक काकचिंग गावातून आली. तिचं हे गाव तिच्या अकादमीपासून 25 किलोमीटर अंतरावर होतं आणि अशा परिस्थितीत ती रोज ट्रकचालकांसोबत सराव करायला येत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT