Paris Olympic 2024 sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : रशियाच्या वैयक्तिक तटस्थ खेळाडूंना प्रथमच पदक; महिला टेनिस दुहेरीत आंद्रीवा व श्नायडर जोडी रौप्यपदकाची मानकरी

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : पॅरिस ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक तटस्थ खेळाडू या नात्याने सहभागी झालेल्या रशियाच्या खेळाडूंना प्रथमच पदक मिळाले. महिला दुहेरीत मिरा आंद्रीवा व डायना श्नायडर जोडी रौप्यपदकाची मानकरी ठरली.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये रशियन क्रीडापटू तांत्रिकदृष्ट्या आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आंद्रीवा व श्नायडर जोडीवर टायब्रेकरपर्यंत लांबलेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत इटलीच्या सारा इर्रानी व जाझ्मिन पावलिनी जोडीने २-६, ६-१, १०-७ अशी मात केली. ऑलिंपिकमध्ये महिलांच्या दुहेरीत निर्धारित तिसऱ्या सेटऐवजी प्रथमच टायब्रेकरचा अवलंब झाला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला चढविल्याच्या पार्श्वभूमीवर पॅरिस ऑलिंपिकमधील सांघिक खेळातून हल्ल्यात सहभागी असलेल्या देशांवर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीने बंदी लादली आहे.

त्यामुळे रशिया आणि बेलारुसमधील खेळाडू पॅरिस स्पर्धेत वैयक्तिक तटस्थ खेळाडू या नात्याने सहभागी झाले असून फ्रेंचमध्ये त्यांनी एआयएन संबोधले जाते. रशियन आणि बेलारशियन पारपत्र असलेल्या खेळाडूंनी ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविल्यानंतर त्यांना तटस्थ या नात्याने सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

एआयएन खेळाडूंना त्यांच्या देशाचा गणवेश परिधान करण्यास मान्यता नाही. त्यामुळे आंद्रीवा व श्नायडर यांनी कोर्टवर खेळताना पूर्ण पांढरे कपडे घातले होते. त्यावर रशियाचा ध्वज किंवा संबंधित कोणतेच चिन्ह नव्हते. यापूर्वी, गेल्या शुक्रवारी बेलारुसच्या इव्हान लिटविनोविच व व्हियालेता बार्डीलोस्काया यांनी ट्रॅम्पोलाईनमध्ये पदके जिंकली.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रथमच एआयएन खेळाडूंनी पदके मिळविली होती. लिटविनोविच पुरुषांत सुवर्णपदक, तर बार्डीलोस्काया महिलांत रौप्यपदक विजेती ठरली होती. त्यानंतर शनिवारी बेलारुसचाच एआयएन खेळाडू यौहेनी झालाटी रोईंगमध्ये रौप्यपदक विजेता ठरला.

फक्त टेनिसवर बोलणार ः श्नायडर

रौप्यपदक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही रशियन खेळाडू साध्या टी-शर्टसमध्ये उपस्थित होते. या वेळी विचारलेल्या प्रश्नावर श्नायडर म्हणाली की, ‘येथे मी राजकारणासंबंधित कोणतेच उत्तर देणार नाही. मी येथे फक्त टेनिस बोलण्यासाठी आले आहे.’

रशियाऐवजी एआयएन समूहाचे प्रतिनिधित्व करण्याविषयी आंद्रीवा म्हणाली की, ‘यासंदर्भात माझ्याकडे उत्तर नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास माझ्यासाठी त्याचा काहीच परिणाम होत नाही. मी फक्त खेळले आणि झुंज दिली. या आठवड्यात आम्ही एकत्रितपणे खेळलो आणि झुंजलो.’

पदक जिंकणारी दुसरी युवा टेनिसपटू

ऑलिंपिक टेनिसमध्ये पदक जिंकणारी १७ वर्षीय आंद्रीवा दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत युवा टेनिसपटू ठरली. १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या जेनिफर कॅप्रियाती हिने वयाच्या १६व्या वर्षी एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

आंद्रीवाची सहकारी २० वर्षीय श्नायडर नॉर्थ कॅरोलिना राज्यात एक मोसम महाविद्यालयीन टेनिस खेळली आहे. दुहेरीत आंद्रीवा आणि श्नायडर एकत्रितपणे खेळण्याची पहिलीच वेळ होती. आंद्रीवा हिने यावर्षी जूनमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली होती. फ्रान्समधील कान्स येथे श्नायडर सराव करते.

इटलीचे पहिलेच ऑलिंपिक सुवर्ण

उन्हाळी ऑलिंपिक्समध्ये इर्रानी व पावलोनी यांनी प्रथमच इटलीला टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. पॅरिस ऑलिंपिकमध्येच इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टी याने पुरुष एकेरीत ब्राँझपदक जिंकले. यापूर्वी इटलीला १९२४ मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये टेनिसमध्ये एक ब्राँझपदक मिळाले होते.

दुहेरीत पाच ग्रँडस्लॅम करंडक पटकावलेल्या ३७ वर्षीय इर्रानी हिने कारकिर्दीत गोल्डन स्लॅमही पूर्ण केले. पावलिनी हिच्यासाठी यंदाचा मोसम सफल ठरला आहे. फ्रेंच ओपन व विंबल्डनमध्ये महिला एकेरीत ती उपविजेती ठरली. फ्रेंच ओपनमधील महिला दुहेरीत तिला इर्रानीच्या साथीत उपविजेतेपद मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT