नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालय, मिशन ऑलिंपिक सेल (एमओसी) यांच्याकडून बजरंग पुनिया, दीपक पुनिया या कुस्तीपटूंना परदेशात सरावाला परवानगी देण्यात आली आहे. तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दोघांचाही परदेशातील सरावाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बजरंग व दीपक या दोन्ही कुस्तीपटूंनी चीनमध्ये होणार असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला प्राधान्य देत जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) दोघांनाही तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले. तंदुरुस्ती प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच त्यांना परदेशात सरावाला परवानगी मिळणार होती.
बजरंगने १९ ऑगस्टला, तर दीपकने २२ ऑगस्टला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी न होण्याचे कारण ई-मेलद्वारे दिले. त्यामध्ये तंदुरुस्तीचे प्रमाणपत्रही जोडण्यात आले आहे. या ई-मेलला प्रत्युत्तर देताना साईकडून स्पष्ट करण्यात आले की, बजरंग व दीपक यांच्या परदेशातील दौऱ्याबाबत तपशील मागवण्यात आला असून त्यांच्या विमानाचे तिकीट लवकरात लवकर काढण्यात येणार आहे.
किर्गीस्तान, रशियामध्ये सराव
बजरंग पुनिया २८ सप्टेंबरपर्यंत किर्गीस्तान येथे सराव करणार आहे. तसेच दीपक रशिया येथे सराव करून आशियाई स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. बजरंगसोबत फिजियोथेरेपिस्ट, वैयक्तिक प्रशिक्षक, एक्सपर्ट व सहकारी किर्गीस्तान येथे जाणार आहेत. दीपकसोबत प्रशिक्षक व फिजियोथेरेपिस्ट रशियाला जाणार आह
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.