Mohammad Kaif on Jasprit Bumrah World Cup 2023 
क्रीडा

World Cup : 'बुमराह खेळला नाही तर भारताचा पराभव निश्चित...' माजी खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Kiran Mahanavar

Mohammad Kaif on Jasprit Bumrah World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 ची उलटी गिनती सुरू झाली आहे. यावेळी स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जात असल्याने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर विजेतेपद पटकावले होते. अशा परिस्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा टीम इंडियाकडून आशा आहेत. टीम इंडियामध्ये सध्या अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, मात्र अलीकडे जसप्रीत बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्याच्या बातमीने भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत, मात्र भारताच्या या माजी क्रिकेटपटूने विश्वचषकापूर्वी बुमराहबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहकडे संघाची कमानही सोपवण्यात आली आहे, मात्र तो आशिया चषक खेळू शकणार का, हा प्रश्न त्याच्या फिटनेसवर आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 बाबत माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हटले की, जर बुमराह वर्ल्ड कप खेळला नाही तर टीम इंडिया टूर्नामेंट गमावेल.

टी-20 वर्ल्ड कप 2022 आणि आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची उणीव भासली. अशा परिस्थितीत मोहम्मद कैफने पिसाई-माय लाइफ इन इंडियन क्रिकेट बुकच्या लाँचिंगवेळी सांगितले की, 50 षटके हे वेगळे स्वरूप आहे. ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळला, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत नेहमीच चांगला खेळतो आणि त्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्डही चांगला आहे.

कैफ पुढे म्हणाला, सध्या भारताला प्रमुख खेळाडूंची उणीव भासत आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांची उणीव आहे. जसप्रीत बुमराह हा भारताची जान आहे. तो परतला नाही तर भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे. आपल्याकडे अजूनही बुमराहचा बॅकअप नाही. बुमराह खेळला नाही तर आम्ही विश्वचषक गमावू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT