Mohammad Rizwan esakal
क्रीडा

Mohammad Rizwan : रडका रिझवान! कमिन्सनं DRS घेत पितळ पाडलं उघडं; Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Rizwan : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान कांगारूंनी पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. चौथ्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 316 धावांची गरज होती. मात्र त्यांचा संपूर्ण डाव 237 धावात गुंडाळला. मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा क्रीजवर होते तोपर्यंत पाकिस्तानला विजयाची आशा होती.

मात्र पॅट कमिन्सने मोहम्मद रिझवानला 35 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. मोहम्मद रिझवान फार विचित्र पद्धतीने बाद झाला. त्यात तो नाबाद असल्याचे नाटक देखील करत होता. मात्र पॅट कमिन्सने डीआरएस घेत त्याला उघडं पाडलं.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात पाकिस्तानसमोर विजयासाठी 316 धावांचे आव्हान ठेवले होते. शान मसूद आणि बाबर आझम यांनी डाव सावरत पाकिस्तानला 150 धावांच्या जवळ पोहचवले. मात्र कमिन्सने शान मसूदला 60 धावांवर तर हेजलवूडने बाबर आझमला 41 धावांवर बाद केलं.

दोन सेट झालेले फलंदाज बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने आधी सौद शकील आणि सलमान आगा यांच्यासोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. शकील 24 धावा करून बाद झाला.

रिझवानने सलमानसोबत पाकिस्तानला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र पॅट कमिन्सने 61 व्या षटकातील चौथा चेंडू बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर चुकवण्याचा केविलवाणा प्रयत्न रिझवानने केला. मात्र चेंडू फार उसळला नाही. तो रिझवानच्या ग्लोव्ह्ज जवळून गेला. मात्र रिझवानने अंपायरसमोर चेंडू त्याच्या हाताला लागून गेल्याचं दाखवले. तो चेंडू हाताला जोरात लागल्याचे हावभाव करू लागला होता.

पंचांनीही त्याला नाबाद ठरवलं. मात्र पॅट कमिन्सला काही हे पटलं नाही त्याने अखेरच्या क्षणी डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये रिझवानच्या हाताला चेंडू लागलाच निसल्याचं आढळून आलं. चेंडू त्याच्या ग्लोव्ह्जला स्पर्श करून गेल्याचं दिसलं अन् तिसऱ्या पंचांनी रिझवानला बाद ठरवलं. बाद झाल्यानंतर, पितळ उघडं पडल्यानंतरही रिझवान मैदान सोडताना नाटक करत होताच!

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 318 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 264 धावा केल्या. पहिल्या डावात 54 धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 262 धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी 316 धावांचे आव्हान होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 237 धावात गारद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्सने 5 तर मिचेल स्टार्कने 4 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने सर्वाधिक 60 तर सलमान आगाने 50 धावांची खेळी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT