India-Pakistan Cricket : पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) खुलासा केला की पाकिस्तान आणि भारत या दोन कट्टर प्रितस्पर्धी संघातील खेळाडू एकमेकांविरूद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहेत. शेजारी असलेले हे दोन देश गेल्या काही वर्षांपासून फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकत्र खेळत आहेत. भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) जवळपास 10 वर्षापूर्वी द्विपक्षीय मालिकेत खेळले होते.
मोहम्मद रिझवानने वेस्ट इंडीज विरूद्धची एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी भारत पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेटबद्दल वक्तव्य केले. मोहम्मद रिझवान काही दिवसांपूर्वीच भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराबरोबर (Cheteshwar Pujara) एकाच संघाकडून इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळला होता.
इंग्लंडमधील या दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. याचबरोबर चेतेश्वर पुजाराने मोहम्मद रिझवानला ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. मोहम्मद रिझवान म्हणाला की, पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेटपटू एकमेकांशी खेळण्यात उत्सुक आहेत. मात्र मालिका खेळणे आणि दोन्ही देशांच्यामधील वाद मिटवणे हे खेळाडूंच्या हातत नाही.'
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमा वाद तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यामुळे भारताने पाकिस्तान बरोबर द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये देखील भाग घेण्याची परवानगी नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिझवानने पुजाराची स्तुती केली होती.
तो म्हणाला की, 'पुजारा हा एक खूप चांगला व्यक्ती आहे. मी त्याच्या एकाग्रतेची आणि लक्ष केंद्रीत करण्याची स्तुती करतो. माझ्या मते युनिस खान, फवाद आलम आणि पुजारा हे तीन खेळाडूंना मी एकाग्ररतेच्या बाबतीत सर्वोकृष्ट मानतो.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.