Mohammed Habib esakal
क्रीडा

Mohammed Habib : पेलेच्या संघाविरूद्ध गोल करणारे मोहम्मद हबीब यांचे निधन; एशियन गेम्समध्येही जिंकून दिलं होतं पदक

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Habib : सत्तरच्या दशकातील भारताचे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे मंगळवारी निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. मोहन बागानकडून खेळणाऱ्या मोहम्मद हबीब यांनी पेले ज्या संघाकडून खेळायचे त्या न्यूयॉर्क कोस्मोस संघाविरूद्ध गोल केला होता.

मोहम्मद हबीब हे पार्किंसन आजाराने ग्रस्त होते. त्यांनी हैदराबादमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. मोहम्मद हबीब यांनी भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधारपद देखील भुषवले होते. (Mohammed Habib Former Indian Footballer)

बँकोक येथे 1970 मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय फुटबॉल संघाने कांस्य पदक जिंकले होते. मोहम्मद हबीब या संघाचे सदस्य होते. याचबरोबर ते मोहन बागान, इस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंगकडून खेळले होते.

त्यानंतर हबीब हे टाटा फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षक होते. 17 जुलै 1949 ला जन्मलेल्या भारताच्या माजी कर्णधार राहिलेल्या हबीब यांनी भारताकडून 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात त्यांनी 11 गोल केले.

1977 मध्ये पेलेच्या संघाविरूद्ध केला गोल

मोहम्मद हबीब यांनी हल्दिया येथे भारतीय फुटबॉल संघ अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते. मोहम्मद हबीब यांनी 1977 मध्ये इडन गार्डन येथे पावसात झालेल्या पेले यांच्या कॉस्मॉस क्लबविरूद्ध गोल केला होता.

त्या संघात पेले, कार्लोस अलबर्टो, जॉर्जियो सी यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. तो सामना 2 - 2 असा ड्रॉ राहिला होता. पेले यांनी सामन्यानंतर मोहम्मद हबीब यांचे कौतुक केले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT