Mohammed Shami Mother esakal
क्रीडा

Mohammed Shami Mother : तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस... मोहम्मद शमीने आईसाठी केली भावनिक पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami Mother : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचा वर्ल्डकप गाजवला. त्याने वर्ल्डकप 2023 मध्ये 24 विकेट्स घेतल्या. भारत फायनलमध्ये पोहचला मात्र अंतिम सामना जिंकून वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.

मात्र हा वर्ल्डकप 2023 शमीसाठी खूप खास राहिला. त्याला हार्दिक दुखापतग्रस्त झाल्यानंतर प्लेईंग 11 जागा मिळाली होती. त्यानंतर तो फक्त भारताचा नाही तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. नुकतेच त्याने सोशल मीडिायवर आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात त्याने आपली आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.

मोहम्मद शमीची आई अनुम आरा यांना भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप फायनल सुरू होती त्यावेळी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहारनपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

मोहम्मद शमीच्या आई फायनल सामन्यादरम्यान अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्यांना ताप आला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिला आहे. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थीर आहे.

शमीची बहीण डॉक्टर मुमताज यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, 'त्यांना ताप आणि अस्वस्थपणा वाटत होता. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थीर आणि सामान्य झाली आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT