क्रीडा

Mohammed Shami : 'संपूर्ण टीम हॉटेलला जायची, मी मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन...' वर्ल्ड कपनंतर शमीचा धक्कादायक खुलासा

Kiran Mahanavar

Mohammed Shami ODI World Cup 2023 Interview : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कपनंतर आपल्या घरी गेला आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये शमीचे वर्चस्व पाहिला मिळाले होते. शमी स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा प्रवास उत्कृष्ट होता, पण वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये आल्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

19 नोव्हेंबरला खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिल्यांदाच टीम इंडिया वर्ल्ड कपदरम्यान बॅकफूटवर दिसली होती. रोहित ब्रिगेडने लीग स्टेज आणि सेमीफायनलसह एकूण 10 सामने जिंकले होते. पण एका खराब सामन्याने टीम इंडियाचे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.

या सगळ्या दरम्यान मोहम्मद शमीने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. जे अनेक क्रिकेट चाहत्यांना माहित नसतील. शमी म्हणाला की, त्याच्या करिअरमध्ये एक वेळ आली. जेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले की तो पुन्हा कधीही खेळू शकणार नाही.

खरं तर, 'पुमा इंडिया'शी खास बातचीत करताना मोहम्मद शमीने सांगितले की, 2015 वर्ल्ड कपपूर्वी माझ्या गुडघ्याला सूज आली होती. अशा परिस्थितीत गुडघ्याची शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय होता. पण मी मात्र ही शस्त्रक्रिया केली नाही आणि क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. प्रत्येक सामन्यानंतर संघ हॉटेलमध्ये जायचा, मी मात्र इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होतो. मी वेदना सहन करून खेळलो. माझ्याकडे दोन पर्याय होते पण विश्रांती घेण्याऐवजी मी देश निवडला.

शमी पुढे म्हणाला की, वर्ल्ड कपनंतर माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. मी दोन तास बेशुद्ध होतो. जेव्हा मी उठलो तेव्हा मी डॉक्टरांना विचारले की मी कधी खेळू शकतो. ते म्हणाला की, तु न लंगडत चालता तरी मोठी गोष्ट आहे. आणि हो खेळणे विसरून जा. हे सर्व तुम्ही किती लवकर बरे व्हाल यावर अवलंबून आहे.

मोहम्मद शमी 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये राहिला. यावेळी तो वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जलद 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याने या मोसमात 7 सामने खेळले आणि 10.7 च्या मजबूत सरासरीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. एकाच वर्ल्ड कपच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा हा तिसरा विक्रम आहे.

या मोसमातील उपांत्य फेरीच्या सामन्यात शमीने न्यूझीलंडविरुद्ध तुफानी गोलंदाजी करत 57 धावांत 7 मोठे बळी घेतले. यासह, तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT