Rohit Sharma Dropped Catch IPL 2023 RCB vs MI  esakal
क्रीडा

Rohit Sharma : कार्तिक - सिराजची झाली टक्कर तरीही रोहितला उठवता आला नाही फायदा

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Dropped Catch IPL 2023 RCB vs MI : आयपीएल 2023 मधील सर्वात हाय व्होल्टेज मॅच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सुरू आहे. दोन्ही संघासाठी हंगामाची दमदार सुरूवात करण्याच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा आहे. मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरूवात मात्र खराब झाली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबईने आपले तीन शिलेदार गमावले. यात कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश होता. त्याला मोहम्मद सिराज आणि दिनेश कार्तिक यांनी दिलेल्या जीवनदानाचा देखील फायदा उठवता आला नाही.

आरसीबीने आपल्या होम ग्राऊंडवरील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मुंबई चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगली सुरूवात करेल असे वाटेत होते. मात्र मोहम्मद सिराजने इशान किशनला 10 धावांवर बाद केले.

यानंतर मुंबईचा महागडा खेळाडू कॅमरून ग्रीन क्रिजवर आला. मात्र रेसी टोप्लेने त्याचा 5 धावंवर त्रिफळा उडवत मुंबई पॉवर प्लेमध्येच दुसरा धक्का देत अवस्था 2 बाद 16 धावा अशी केली.

ग्रीन बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी रोहित शर्मावर होती. मात्र सुरूवातीपासूनच रोहित चाचपडत खेळत होता. त्यातच मोहम्मद सिराजचा एक शॉर्ट बॉल पूल करण्याच्या नादात त्याच्या बॅटची टॉप एज लागली अन् चेंडू उंच उडाला. हा झेल घेण्यासाठी मोहम्मद सिराज आणि विकेटकिपर दिनेश कार्तिक धावले. मात्र या दोघांनी एकमेकांना कोणताही संकेत न दिल्याने दोघांची टक्कर झाली अन् रोहितला अवघ्या 1 धावेवर जीवनदान मिळाले.

आता रोहित शर्मा या जीवनदानाचा फायदा उचलणार आणि आरसीबीला ही टक्कर फार महागात पडणार असे वाटत असतानाच आकाशदीपने रोहित शर्माला पुढच्याच षटकात बाद केले. यामुळे रोहितला जीवनदान मिळूनही मुंबईला त्याचा काहीच फायदा झाला नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

Uddhav Thackeray : भाजपचा ‘सत्ता जिहाद’ महाराष्ट्राची जनता संपवेल! : उद्धव ठाकरेंची गर्जना

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ नोव्हेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४)

SCROLL FOR NEXT