SA vs IND  esakal
क्रीडा

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेची दयनीय अवस्था करण्यात इंग्लंडनंतर भारताचाच नंबर; मायदेशात अप्रिय रेकॉर्ड

अनिरुद्ध संकपाळ

SA vs IND Test Cricket Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर मायदेशात खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावात संपुष्टात आला. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर एक अप्रिय विक्रम देखील नोंदवला गेला.

भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावला. त्यानंतर संघावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. मात्र दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या तासाभारताच भारतीय संघाने आपला दम पुन्हा एकदा दाखवून दिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावात संपुष्टात आणला.

दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने एकट्याने 6 विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आफ्रिकाची केप टाऊन कसोटीत शंभरच्या आत ऑल आऊट होण्याची 10 वी वेळ आहे. भारताच्या दृष्टीकोणातून पहायचं तर केप टाऊन हा दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला आहे. तिथे भारताने एकदाही कसोटी सामना जिंकलेला नाही. मात्र रोहित शर्माचा संघ यंदा हा इतिहास बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केप टाऊनमध्ये भारताने आफ्रिकेचा पहिल्या डावात 55 धावात संपूर्ण संघ गारद केला. ही आफ्रिकेची केप टाऊनमधील चौथी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. केप टाऊनवर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला चांगलेच दमवले आहे. त्यांनी 1899 मध्ये आफ्रिकेला 35 धावांवर ऑल आऊट केले होते. ती आफ्रिकेची या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या ठरली होती.

दक्षिण आफ्रिकेची कसोटीत केप टाऊनमधील सर्वात कमी धावसंख्या

  • 1899 - इंग्लंड - 35 धावा

  • 1889 - इंग्लंड - 43 धावा

  • 1889 - इंग्लंड - 47 धावा

  • 2024 - भारत - 55 धावा

  • 1957 - इंग्लंड - 72 धावा

  • 1892 - इंग्लंड - 83 धावा

  • 1902 - ऑस्ट्रेलिया - 85 धावा

  • 2011 - ऑस्ट्रेलिया - 96 धावा

  • 1892 - इंग्लंड - 92 धावा

  • 1957 - ऑस्ट्रेलिया - 99 धावा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT