Achraf Hakimi : कतारमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत मोरोक्कोच्या संगाने सेमी फायनल गाठत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या मोरोक्कोचा स्टार डिफेंडर अचरफ हकिमीवर बलात्काराचा आरोप झाला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पॅरिस सेंट जेर्मन संघाकडून खेळणाऱ्या अचरफवर 24 वर्षीय महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत अशी माहिती एएफपीने दिली.
माद्रिद येथे जन्मलेला अचरफ हकिमी हा वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलपर्यंत धडक मारणाऱ्या मोरोक्को संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. हकिमी हा शुक्रवारी सकाळी पीएसजीच्या सराव सत्रात दिसला होता. यानंतर बलात्काराच्या आरोपाबाबत एएफपीने क्लबशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
हकिमीवर आरोपी महिलेने हकिमीच्या घरी पैसे देऊन बोलवलं होते. यावेळी हकिमीची मुले आणि पत्नी सुट्टी घालण्यासाठी बाहेर गेले होते. हकिमी गेल्या सोमवारी फिफाच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी पॅरसमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याला फिफा प्रो मेन्स वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कारही देण्यात आला.
कतारमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये मोरोक्को हा सेमी फायनल गाठणारा अरब जगतातील पहिला संघ ठरला होता. या संघातील हकिमी हा एक महत्वपूर्ण फुटबॉल खेळाडू होता. फ्रान्सच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीवर आरोप केल्यावर त्याला लगेच त्याच्यावर खटला चालवला जात नाही.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.