Most Iconic FIFA World Cup Moments in HISTORY sakal
क्रीडा

Fifa World Cup : झिदानची ढुशी ते मॅराडोनाचा Hand of God, वाचा वर्ल्डकप मधले वादग्रस्त प्रसंग

आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपच्या इतिहासातील वादग्रस्त क्षणांवर टाकलेला हा प्रकाशझोत

सकाळ ऑनलाईन टीम

फिफा वर्ल्डकपचा धमाका २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये होणार आहे. दर चार वर्षांनी खेळवण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपच्या इतिहासातील वादग्रस्त क्षणांवर टाकलेला हा प्रकाशझोत...

Most Iconic FIFA World Cup Moments in HISTORY

मॅराडोनाचा हँड ऑफ गॉड - (मेक्सिको, १९८६)

मेक्सिको येथे १९८६मध्ये फुटबॉल विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. हा विश्‍वकरंडक फक्त आणि फक्त अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोना यांच्यासाठीच ओळखला जातो. त्याच्या अफाट आणि अद्वितीय कौशल्यामुळे अर्जेंटिनाने दुसऱ्यांदा विश्‍वविजेतेपदावर मोहोर उमटवली. २२ जून रोजी अर्जेंटिना - इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगली. या लढतीत मॅराडोना यांनी दोन अद्‌भुत गोल करीत आपल्या देशाला विजय मिळवून दिला. त्यातील पहिला गोल हा ५१व्या मिनिटाला झाला. हा गोल फुटबॉलच नव्हे तर क्रीडा इतिहासात ‘हँड ऑफ गॉड’ या नावाने ओळखला जातो. इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बॉबी रॉबसन यांनी विंगर न खेळवल्यामुळे मॅराडोना यांना पुढे जायला जागा मिळाली. स्टीव हॉग याला चकवत मॅराडोना पुढे गेले. त्यानंतर पेनल्टी बॉक्समध्ये इंग्लंडचा गोलकीपर पीटर शिल्टन व मॅराडोना एकमेकांना भिडले. मॅराडोना यांची उंची कमी असल्यामुळे उडी मारताना त्यांचा हात फुटबॉलला लागला आणि गोलजाळ्यात अडकला. पण हे मैदानातील पंचांना दिसले नाही. अर्जेंटिनाला गोल बहाल करण्यात आला. बॉबी रॉबसन यांनी मॅराडोना यांच्या त्या गोलवर टीका केली. पण त्यानंतर चार मिनिटांमध्ये मॅराडोना यांनी इंग्लंडच्या चार खेळाडूंना व गोलरक्षकाला चकवत शतकातील सर्वोत्तम गोल केला आणि अर्जेंटिनाला इंग्लंडवर २-० असा विजय मिळवून दिला.

Most Iconic FIFA World Cup Moments in HISTORY

उरुग्वेच्या सुआरेझचा इटलीच्या किलीनीला चावा - (ब्राझील, २०१४)

ब्राझीलमध्ये २०१४चा विश्‍वकरंडक आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत खेळाला कलंक लागणारी घटना घडली. ‘ड’ गटामध्ये कोस्टारिका, इंग्लंड, इटली व उरुग्वे या देशांचा समावेश होता. या गटातील अखेरच्या साखळी फेरीत वादग्रस्त घटना घडली. उरुग्वे व इटली यांच्यामधील लढतीत लुईस सुआरेझ याने जिऑर्जिओ किलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. त्याने हे कशाला केले, हे त्यालाच माहीत असावे. उरुग्वेने ही लढत जिंकून बाद फेरीत प्रवेशही केला. पण सुआरेझने त्याचा चावा घेतल्यामुळे ‘फिफा’कडून त्याच्यावर नऊ सामन्यांची बंदी घातली. तसेच चार महिने फुटबॉलशी संबंधित सर्व बाबींपासून दूर केले.

Most Iconic FIFA World Cup Moments in HISTORY

झिदानची मॅटेराझीला ढुशी (हेडबट) - (जर्मनी, २००६)

फ्रान्सने ब्राझीलला हरवत १९९८सालचा वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये झिनेदीन झिदानचा जबरदस्त कामगिरीचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्याने २००६मधील जर्मनी येथील वर्ल्डकपमध्ये फ्रान्सला अंतिम फेरीत नेले. सातव्या मिनिटालाच पेनल्टीवर गोल करून १-० अशी आघाडीही मिळवून दिली. पण मार्को मॅटेराझी याने हेडरवर अप्रतिम गोल करीत इटलीसाठी बरोबरी साधली. यानंतर मॅटेराझी याने झिदानला उद्देशून अपशब्द काढले. हा राग अनावर झाल्यामुळे झिदानने मैदानातच मॅटेराझी याला हेडबट अर्थातच डोक्याने छातीवर मारले. झिदानने ढुशी मारल्याचे कॅमेरामध्ये कैद झाले. झिदानला त्याक्षणी मैदानाबाहेर काढण्यात आले. इटलीने ही लढत पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ अशी जिंकली आणि जेतेपदावरही मोहोर उमटवली.

Most Iconic FIFA World Cup Moments in HISTORY

रेफ्रींचा संशयास्पद निर्णय - (दक्षिण कोरिया, जपान, २००२)

आशिया खंडात पहिल्यांदाच वर्ल्डकपचे आयोजन २००२मध्ये करण्यात आले. या वर्ल्डकपची यजमानी दक्षिण कोरिया व जपानला मिळाली. या वर्ल्डकपमध्ये अंतिम १६ फेरीची लढत इटली आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये रंगली. इटलीच्या ख्रिस्तीयन विअरी याने परफेक्ट गोल केला होता. याप्रसंगी रेफ्रींकडून याला ऑफ साईड देण्यात आले. त्यामुळे इटलीचा तो गोल नाकारण्यात आला. मात्र याचा फटका इटलीला बसला. निर्धारित वेळेमध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर ११७व्या मिनिटाला ॲन वॉन याने दक्षिण कोरियासाठी गोल केला. या गोलमुळे दक्षिण कोरियाने उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. इटलीचे आव्हान तिथेच संपुष्टात आले.

Most Iconic FIFA World Cup Moments in HISTORY

हाताने अडवला फुटबॉल - (दक्षिण आफ्रिका, २०१०)

२०१०मधील वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. या वर्ल्डकपमध्ये उरुग्वे - घाना यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत झाली. या लढतीच्या निर्धारित वेळेमध्ये दोन्ही देशांमध्ये १-१ अशी बरोबरी झाली. ही लढत निकाल लागण्यासाठी जादा वेळेत पोहोचली. घानाच्या डॉमिनिक एदीईया याने मारलेला हेडर लुईस सुआरेझ याने हाताने अडवला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. घानाला पेनल्टीही देण्यात आली. पण घानाच्या असामोह ग्यान याला पेनल्टीवर गोल करता आला नाही. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांचा ४-२ असा पराभव झाला. तब्बल ४० वर्षांनंतर उरुग्वेचा संघ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचला. आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा आफ्रिका खंडातील पहिला देश अशी ओळख मिळण्यापासून घाना दूर गेला. सुआरेझ याने या वेळी केलेल्या कृतीबाबत खेद व्यक्त न करता आनंद व्यक्त केला. खरा हँड ऑफ गॉड माझाच आहे, असे तो म्हणाला. कारण त्याने अडवलेल्या गोलमुळे उरुग्वेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT