most important of ICC Twenty20 World Cup revealed in A survey
most important of ICC Twenty20 World Cup revealed in A survey Sakal
क्रीडा

ICC T20 World Cup : आयसीसीच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे वाढते महत्त्व; डब्ल्यूसीएच्या सर्व्हेतून स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आयसीसीच्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला सर्वाधिक महत्त्व आहे. हीच विश्वकरंडक स्पर्धा मुख्य विश्वकरंडक म्हणून समजली जाते; पण ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे महत्त्व खेळाडूंमध्येच वाढत असल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट होत आहे. हा सर्व्हे खेळाडूंकडूनच करण्यात आला आहे.

जागतिक क्रिकेटर्स संघटना (डब्ल्यूसीए) यांनी हा महत्त्वाचा सर्व्हे केला आहे. २०१९ मध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला ८५% खेळाडूंनी सर्वाधिक महत्त्व दिले होते, त्यावेळी १५% महत्त्व ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

यंदाच्या २०२४ यावर्षीही पुन्हा सर्व्हे करण्यात आला आणि एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्राधान्य असलेली टक्केवारी कमी झाली, तर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठीची टक्केवारी वाढली आहे. ५०% ः ३५% अशी ही टक्केवारी झाली आहे.

यंदाची ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडीज या देशात संयुक्तपणे झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंचा कल जाणून घेण्यात आला. २६ वर्षांखालील तरुण खेळाडूंचा वेगळा सर्व्हे करण्यात आला आणि त्यांनी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला प्राधान्य देणारी टक्केवारी ४१ तर एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी ४९% इतकी झाली.

एकूणच ट्वेन्टी-२० प्रकाराचे महत्त्व क्रिकेटविश्वात वाढत आहे. २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटला ८२% खेळाडूंचे प्राधान्य होते. हे प्रमाण आता ४८% वर आले आहे. तर ३०% खेळाडूंनी टी-२० प्रकार अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे.

जागतिक क्रिकेट संघटना ही जगमान्य संघटना नाही, त्यामुळे भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील खेळाडू या संघटनेत सहभागी नाहीत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या देशातील खेळाडू या संघटनेशी संलग्न आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT