Dilano van't Hoff Passed Away  sakal
क्रीडा

Video : क्रीडा विश्वात पसरली शोककळा! या स्टार खेळाडूचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Kiran Mahanavar

Dilano van't Hoff Passed Away : बेल्जियममधील स्पा-फ्रँकोरचॅम्प्स सर्किटमध्ये 18 वर्षीय डच ड्रायव्हर डिलानो व्हॅन टी हॉफचा अपघाती मृत्यू झाला. फॉर्म्युला रिजनल युरोपियन चॅम्पियनशिप शर्यतीत तो एमपी मोटरस्पोर्टसाठी स्पर्धा करत असताना त्याचा हा अपघात झाला. डिलानो व्हॅन टी हॉफ हा नेदरलँडचा रेसिंग ड्रायव्हर होता. तो विविध मोटरस्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आहे, आणि ट्रॅकवर त्याने आपली प्रतिभा ही दाखवली आहे.

एमपी मोटरस्पोर्ट ड्रायव्हर डिलानो व्हॅन टी हॉफने स्पा-फ्रँकोरचॅम्प्स सर्किट शर्यतीत भाग घेतला होता. रेस आयोजकांनी एका निवेदनात म्हटले की, या कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येकाला फॉर्म्युला EU शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात डिलानो व्हॅन टी हॉफचा जीव गमवावा लागल्याच्या बातमीने दु:ख झाले आहे. आम्ही त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि एमपी मोटरस्पोर्ट यांच्याबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो.

डिलानो व्हॅन टी हॉफ FRECA मध्ये त्याच्या दुसऱ्या पूर्ण हंगामात स्पर्धा करत होता. त्याच्या पहिल्या वर्षी तो बार्सिलोनामध्ये पोडियमवर पोहोचण्यात यशस्वी झाला. त्याने 2022 मध्ये त्या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. FRECA च्या आधी डिलानोने 2021 मध्ये दोन वेगवेगळ्या फॉर्म्युला 4 चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. UAE मालिकेत त्याने दुसरे स्थान पटकावले, तर त्या वर्षी त्याने स्पॅनिश F4 विजेतेपद जिंकले.

F1 चे सीईओ स्टेफानो डॉमेनिकली यांनी डिलानो व्हॅन टी हॉफच्या कुटुंबियांना आणि मित्रांना त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केले. स्टेफानो डोमेनिकाली यांनी निवेदनात म्हटले आहे की, 'डिलानो व्हॅन टी हॉफचे आज स्पा-फ्रँकोरचॅम्प्समध्ये निधन झाल्याचे कळून खूप दु:ख झाले. मोटरस्पोर्टच्या शिखरावर पोहोचण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करताना डिलानोचा मृत्यू झाला. संपूर्ण मोटरस्पोर्ट समुदायासह, आमचे विचार त्याच्या कुटुंबासोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT