MS Dhoni london : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग किती आहे, हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. माहीच्या प्रत्येक स्टाइलचे लोक वेडे आहेत. धोनीला पाहून लोक त्याच्यासोबत ऑटोग्राफ आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात. धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहे. धोनी गेल्या दोन आठवड्यांपासून लंडनमध्ये एन्जॉय करत आहे. (ms dhoni fans selfie hungry london video viral sports cricket eng vs ind)
धोनी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसापूर्वी इंग्लंडमध्ये पोहोचला होता, जिथे त्याने आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत 41 वा वाढदिवसही साजरा केला. यावेळी धोनीसोबत काही भारतीय क्रिकेटर्सही उपस्थित होते.
धोनी सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या सामन्यांचा आनंद घेत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या T20I नंतर त्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमलाही भेट दिली. पहिल्या वनडेशिवाय लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेवेळीही धोनी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र, आता तो तिसऱ्या वनडेसाठी मँचेस्टरला जातो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
धोनीच्या फॅन फॉलोअर्सला मर्यादा नाही कारण जगभरात त्याचे करोडो चाहते आहे. चाहत्यांना धोनी लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसला, त्यानंतर चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चाहते धोनीसोबत सेल्फी घेण्यासाठी त्याच्या मागे धावत आहेत. मात्र, माही गाडीत बसून तेथून निघून गेला. चाहत्यांचा धोनीचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून तो टीम इंडियाचा भाग नाही पण आयपीएलमध्ये दिसतो आणि खेळाडूंसोबत त्याचा अनुभव शेअर करतो. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा चॅम्पियन बनवले आहे. तो भारताचा देखील सर्वात यशस्वी कर्णधार होता. ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली देशासाठी तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.