BCCIचे वरिष्ठ अधिकारी काय म्हणाले, वाचा...
T20 World Cup 2021 स्पर्धेसाठी भारताचा १५ खेळाडूंचा चमू (Team India Squad) बुधवारी जाहीर करण्यात आला. भारताच्या संघात अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीला कर्णधार (Captain Virat Kohli) तर रोहित शर्माला उपकर्णधारपद (Vice Captain Rohit Sharma) देण्यात आले. त्यावर 'सोने पे सुहागा' म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला संघाचे मार्गदर्शकपद (Mentor) देण्यात आले. अशा परिस्थितीत विराट, रोहित, धोनी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हा टीम इंडियाच्या नव्या चौकोनाबद्दल BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एक वक्तव्य केले.
"भारतीय संघाच्या मार्गदर्शकपदी महेंद्रसिंग धोनी याची निवड करण्याचा निर्णय अतिशय योग्य आणि चांगला आहे. धोनी, विराट, रोहित आणि रवी शास्त्री यांचा नवा चौकोन टीम इंडियासाठी खूप फलदायी ठरू शकेल. या चौघांकडेही नेतृत्वशैली अफाट आहे. त्यांच्या एकत्रित येण्याने भारतीय संघाची विजेतेपदाच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या आहेत. BCCI सचिव जय शाह यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक वाटते", अशा शब्दात BCCI चे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी बोर्डाच्या निर्णयाची स्तुती केली.
लोढा समितीच्या शिफारशींनुसार, एक व्यक्ती दोन पदे एकाच वेळी भूषवू शकत नाही. महेंद्रसिंग धोनी हा सध्या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. त्याचसोबत त्याला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणूनही निवडण्यात आले आहे. ही बाब लोढा समितीच्या शिफारशींनुसार योग्य नाही, अशी तक्रार मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे माजी आजीव सभासद संजीव गुप्ता यांनी केली आहे. या आधीही त्यांनी लोढा समितीच्या शिफारशींचा आधार घेत अनेक वेळा लाभाच्या पदांबाबतच्या विविध खेळाडूंच्या तक्रारी केल्या आहेत. धोनीच्या बाबतीत एकाच वेळी दोन ठिकाणी पदे भूषवणे म्हणजे लाभाच्या पदाच्या कलमाचे उल्लंघन ठरेल, अशी तक्रार गुप्ता यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.